ट्विटरचा (Twitter) ताबा घेतल्यानंतर इलॉन मस्कने (Elon Musk) त्यामध्ये बदलाव करण्याचा प्रयत्न केला आहे.  गेल्या वर्षी, मस्कने "ट्विटर 2.0 द एव्हरीथिंग अॅप" साठी योजनेसाठी हिरवा कंदील दाखवला होता, ज्यात एनक्रिप्टेड डायरेक्ट मेसेज (डीएम), लाँगफॉर्म ट्विट आणि पेमेंट यांसारखी फिचर्स असणार आहे. "लवकरच तुमच्या हँडलवरून या प्लॅटफॉर्मवर कोणाशीही व्हॉईस आणि व्हिडिओ चॅट (Voice And Video Chat) केले जाईल, जेणेकरून तुम्ही जगात कुठेही असलेल्या लोकांशी तुमचा फोन नंबर न देता बोलू शकता," असे मस्क यांनी एका ट्विटमध्ये म्हटले.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)