Twitter logo (Photo courtesy: Twitter)

ट्वटर (Twitter ) युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. Retweets हा ऑप्शन ट्विटर लवकरच बंद करण्याची शक्यता आहे. मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर लवकरच एक छळवणूक विरोधी फिचर्स (Anti-Harassment Features) युजर्सच्या सेवेत दाखल करण्याची शक्यता आहे. हे फिचर लॉन्च झाल्यावर ट्विटरवर रिट्विट आणि दुसऱ्या यूजर्सला मेंन्शन करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली जाणार आहे. गेल्या 5 नोव्हेंबर रोजी ट्विटरचे वॉइस प्रेजिडेंट ऑफ डिजाइन अॅण्ड रिसर्च डेंटली डेविस यांनी एका ट्विटमध्ये हे संकेत दिले आहेत.

डेविस यांनी आपल्या ट्विटमध्ये , 2020 मध्ये ट्विटरवर कोणकोणते बदल केले जाऊ शकतात याचे संकेत दिले होते. डेविस यांनी संकेत देत म्हटले होते की, ते यूजर्सच्या ट्विटवर अधिक नियंत्रण देऊ इच्छितात. ज्यामुळे ट्विटरवर यूजरच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही त्यांच्या संवादाचा भाग बणू शकणार नाहीत. डेविस यांचे संकेत विचारात घेतले तर, यूजर्स लवकरच स्वत: ठरवू शकतात की इतर यूजर्स त्यांचे ट्विट रिट्वीट करु शकतात किंवा नाही. (हेही वाचा, Twitter वर 22 नोव्हेंबर पासून दिसणार नाही राजकीय जाहिरात)

आयएएनएस ट्विट

डेविस डेंटली ट्विट

ट्विटर वीपी ऑफ डिजाइन अॅण्ड रिसर्च डेविस यांनी म्हटले आहे की, यूजर्सला प्लॅटफॉर्मवर मेन्शनशी संबंधीत नियंत्रण मिळेल. यूजर्स कन्वर्सेशनमधऊन एखाद्या यूजर्सला हटवू शकतील तसेच त्याला मेन्शनमधूनही बाहेरचा रस्ता दाखवू शकतील. अशा पद्धतीने युजर्सच्या परवानगीनंतरच त्यांना ट्विटरवर मेन्शन केले जाईन. कोणत्याही कन्वर्सेशनमध्ये युजरच्या मान्यतेशिवाय कोणीही त्यांना समाविष्ठ करु शकणार नाही.