Xiaomi, Boat ब्रँडला टक्कर द्यायला आलाय 'Truke Fit Pro' ट्रू वायरलेस ईयरफोन'; पाहा याची खास वैशिष्ट्ये
TrukeFit Pro (Photo Credits: Twitter)

सध्या लॉकडाऊनमुळे अनेक जण घरात बसून ऑफिसचे काम करतायत तर काही जण मस्त नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम सारख्या OTT प्लॅटफॉर्मवर आपले आवडते चित्रपट, वेब सीरिज, तसेच गेम्स खेळताना दिसत आहे. अशा परिस्थितीत त्याचा व्हिडिओ ऐकण्यात कोणताही व्यत्य येऊ नये किंवा मोबाईलवर चित्रपट पाहताना आवाजामुळे इतरांना त्रास होऊ नये यासाठी बाजारात एक जबरदस्त ईयरफोन आला आहे. Trukfit Pro असे या ईयरफोनचे (Earphone) नाव असून हा बाजारात अन्य कंपनीच्या ईयरफोनला तगडी टक्कर देईल असे चित्र एकून निर्माण झाले आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ईयरफोनची किंमत 999 रुपये इतकी आहे. अमेझॉनवर हा ईयरफोन विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. बाजारात लोकप्रिय असलेल्या Xiaomi, Boat, Noise यांसारख्या ब्रांडला हा तगडी टक्कर देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेदेखील वाचा- आठ तासांचा बॅटरी बॅकअप; Mi Neckband Bluetooth Earphones भारतात लॉन्च, किंमत ₹1,599; जाणून घ्या फिचर्स

Trukfit Pro ईयरफोनविषयी बोलायचे झाले तर, यात युएसबी-टाइप-सी चार्जिंग, ब्लूटुथ 5.0 देण्यात आले आहे. शिवाय याचे चार्जिंग 24 तासापर्यंत राहते असा या कंपनीने दावा केला आहे. शिवाय हा 1 तासाचा प्लेबॅक ऑफर सुद्धा करतो. यात 500mAH ची बॅटरी देण्यात आली आहे. हा ईयरफोन 13MM डायनॅमिक ड्रायव्हर्स ने सुसज्ज आहे.

या ईयरफोनचे आणखी खास वैशिष्ट्य म्हणजे यात व्हॉईस असिस्टंट सपोर्टसुद्धा देण्यात आला आहे. जो Android आणि iOS डिव्हाईसवर काम करेल.