आठ तासांचा बॅटरी बॅकअप;  Mi Neckband Bluetooth Earphones भारतात लॉन्च, किंमत ₹1,599; जाणून घ्या फिचर्स
Mi Neckband Bluetooth Earphones | (Photo Credits: Redmi India)

Mi Neckband Bluetooth Earphones भारतात लॉन्च करण्यात आला आहे. कंपनीने आज (बुधवार, 17 जुलै 2019) रेडमी K20 सीरीजच्या लॉन्च इंव्हेंटमध्ये आपल्या बहुचर्चीत नॅकबँडवरुन पडदा उठवला आहे. या हेडफोनची भारतातील किंमत 1,599 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. नवा नेकबैंड फ्लिपकार्टवर आणि Mi.com च्या माध्यमातून 23 जुलै पासून उपलब्ध असेन.

या हेडफोनच्या वैशिष्ट्यांबाबत सांगायचे तर, कंपनीने दावा केला आहे की, या हेडफोनचा बॅटरी बॅकअप तब्बल आठ तासांचा आहे. या हेडफोनची बँटरी एकदा चार्ज केली की ती पुढे आठ तास चालते. स्पेसिफिकेशन्सबाबत बोलायचे तर, एमआय नेकबँड ब्लूटूथ एअरफोन मायक्रो-अर्क कॉलर डिजाईनमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने म्हटले आहे की, हा हेडफोन स्किन फ्रेण्ली रबर मरेटियलबासून तयार करण्यात आले आहे. जे अॅण्टी -स्लिप आणि फ्लेक्सिबल आहे. नव्या नेकबँडचे वजन केवळ 13.6 ग्रॅम इतके आहे.

रेडमी इंडिया ट्विट

MI नेकबँड ब्लुटूथ इअरफोन्समध्ये वॉइस कमांड फीचरही देण्यात आले आहे. ज्याच्या माध्यमातून कॉल रिसिव्हींग आणि आणि गाणी ऐकण्यासाठी आवाजावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. कनेक्टिविटीसाठी नेकबँडमध्ये एचएफपी सपोर्टसोबत साथ ब्लूटूथ v5.0, A2DP, HSP आणि AVRCP प्रोटोकॉल्स देण्यात आले आहेत.

हा हेडफोन 10 मीटर रेंजसोबत येतो. यात 20mAh ची बिल्ट-इन बॅटरी देण्यात आली आहे. जी एकवेळ चार्ज केल्यावर तब्बल 8 तास चालते असा कंपनीने दावा केला आहे. बॅटरीचा स्टँडबाय 260 तासांचा आहे. जो संपूर्ण चार्ज होण्यासाठी 2 तास इतका कालावधी लागतो.