Truecaller AI Feature: ट्रूकॉलर वापरता? स्पॅम कॉल टाळण्यासाठी आणि ब्लॉक करण्यासाठी आलंय नवीन AI फीचर; घ्या जाणून
Truecaller | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

प्रसिद्ध मोबाईल App Truecaller ने AI-आधारित नवे फीचर आणले आहे. ज्यामुळे फेक कॉल, स्पॅम कॉल, मेसेज आणि अनोळखी क्रमांकापासून सहज सूटका मिळवता येणार आहे. हे नवीन रोल-आउट वैशिष्ट्य स्पॅमर आणि संभाव्य स्कॅमर यांच्याकडून चांगली सुरक्षा प्रदान करण्यासाठी सर्व स्पॅम कॉल स्वयंचलितपणे अवरोधित करेल. प्राप्त माहितीनुसार हे फीचर सध्या केवळ च्या Android ॲपवर उपलब्ध आहे आणि ते सशुल्क आहे. जे केवळ ॲपच्या प्रीमियम सदस्यांसाठी उपलब्ध आहे. तुम्हालाही तुमच्या मोबाईलमध्ये हे अॅप सक्रीय करायचे असेल तर तुम्ही ते करु शकता. हे अॅप प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. फक्त त्याच्या नियम व अटी तूम्हाला पूर्ण कराव्या लागतील. हे अॅप वापरु इच्छिणाऱ्यांसाठी आवश्यक माहिती खालील प्रमाणे.

प्रथम प्ले स्टोरवर जा. तिथे Truecaller सर्च करा. आलेले अधिकृत अॅप डाऊनलोड करा. अॅप डाऊनलोड होईपर्यंत वाट पाहा. ते डाऊनलोड होताच उघडा. त्याच्या सेटिंग्ज पर्यायावर टॅप करा. ब्लॉक विभागात नेव्हिगेट करा. तुम्हाला तीन टॅब दिसतील: बंद (Off), मूलभूत (Basic) आणि साधारण (Max). सर्वात भक्कम स्पॅम संरक्षण सक्षम करण्यासाठी "मॅक्स" टॅब निवडा. या सर्व पायऱ्या पार केल्यानंतर तुम्ही Truecaller वर उच्च पातळीचे संरक्षण प्राप्त करु शकाल. जे ज्ञात स्पॅमर्सचे कॉल स्वयंचलितपणे अवरोधित करेल. (हेही वाचा, Digital Government Directory: सरकार आणि नागरिक यांच्यातील दुवा ठरणार Truecaller डिजिटल गवर्नमेंट डिक्शनरी)

नव्या फीचरचे खास वैशिष्ट्य असे की, तुम्ही ॲपवर मॅक्स निवडता तेव्हा, ते ज्ञात स्पॅमर्सचे कॉल आपोआप ब्लॉक करेल. दरम्यान, ही सेटिंग कायदेशीर व्यवसायांकडील कॉल देखील अवरोधित करू शकते. Truecaller मधील Search चे उपाध्यक्ष कुणाल दुआ यांनी माहिती देताना सांगितले की,, कंपनीने स्पॅम नंबर ओळखण्यासाठी मार्केटमध्ये विविध अल्गोरिदमची चाचणी केली आणि नंतर वैशिष्ट्य प्रत्यक्षात आणण्यासाठी AI सिस्टमचा वापर केला. ट्रूकॉलरने वैशिष्ट्य सुधारण्यासाठी वापरकर्त्यांचा अभिप्राय देखील विचारात घेतला आहे. त्यावर भविष्यात काम केले जाईल. (हेही वाचा, Truecaller चे नवे फिचर ; असा करा कॉल रेकॉर्ड)

दरम्यान, ट्रूकॉलरचे एआययुक्त फीचर वापरण्यासाठी वापरकर्त्यांना Truecaller च्या प्रीमियम प्लॅनचे सदस्यत्व सध्यातरी घ्यावे लागणार आहे. भारतात ही सदस्यता मासिक 75 रुपयांपासून सुरु होते. या प्लॅनची वार्षीक सदस्यता 529 रुपयांना मिळते आहे. Truecaller ने भारतात कॉल रेकॉर्डिंग आणि AI-चालित ट्रान्सक्रिप्शन सादर केल्यानंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत हे नवीन वैशिष्ट्य जोडले आहे. या फीचर्समुळे वापरकर्त्यांना अनोळखी कॉलपासून अधिक संरक्षण मिळणार आहे.