World's Best Companies of 2023: टाइम मॅगझिन आणि ऑनलाइन डेटा प्लॅटफॉर्म स्टॅटिस्टाने 2023 साठी जगातील सर्वोत्तम कंपन्यांची टॉप (World's Best Companies of 2023) 750 यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीनुसार, टॉप 100 कंपन्यांमध्ये इन्फोसिस (Infosys) या भारतीय कंपनीचा समावेश आहे. टॉप 100 च्या यादीत इन्फोसिस 64 व्या स्थानावर आहे. या यादीत मायक्रोसॉफ्ट, ऍपल, अल्फाबेट आणि मेटा प्लॅटफॉर्म सारख्या तंत्रज्ञान कंपन्या आघाडीवर आहेत. टाईम आणि स्टॅटिस्टाने एकूण 750 कंपन्यांची नावे प्रसिद्ध केली आहेत. रँकिंग महसूल वाढ, कर्मचारी समाधान सर्वेक्षण आणि कठोर पर्यावरणीय, सामाजिक आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स डेटावर आधारित सूत्राच्या आधारे कंपन्यांची यादी केली जाते.
टाईमच्या यादीत या भारतीय कंपन्यांची नावे -
750 कंपन्यांच्या संपूर्ण यादीबद्दल बोलायचे झाल्यास, Infosys व्यतिरिक्त, टाइमच्या या यादीत इतर सात भारतीय कंपन्यांची नावे समाविष्ट आहेत. विप्रो लिमिटेड 174व्या, महिंद्रा समूह 210व्या, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड 248व्या, HCL टेक्नॉलॉजीज लिमिटेड 262व्या, HDFC बॅंक 418व्या, WNS ग्लोबल सर्व्हिसेस 596व्या आणि ITC लिमिटेड 672व्या क्रमांकावर आहे. याशिवाय जगातील पहिल्या तीन व्यावसायिक सेवा कंपन्यांमध्येही इन्फोसिसचे नाव आहे. (हेही वाचा - Emergency Alert on Phone: तुमच्या फोनवरही आला आहे का भारत सरकारचा इमरजेंसी अलर्ट मेसेज? काय आहे याचा अर्थ? जाणून घ्या)
इन्फोसिस लिमिटेड ही एक भारतीय बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपनी आहे जी व्यवसाय सल्ला, माहिती तंत्रज्ञान आणि आउटसोर्सिंग सेवा प्रदान करते. इन्फोसिसची स्थापना 1981 मध्ये झाली. इन्फोसिसचा उद्देश मानवी क्षमता वाढवणे आणि लोक, व्यवसाय आणि समुदायांसाठी पुढील संधी निर्माण करणे हा आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, Infosys पुढील पिढीच्या डिजिटल सेवा आणि सल्लामसलत मध्ये जागतिक आघाडीवर आहे.