TikTok App (Photo Credits- Twitter)

सोशल मीडियात व्हिडिओसाठी प्रसिद्ध असणारे टिकटॉक अॅपने (TikTok) कोरोना व्हायरस संबंधित खोट्या बातम्यांवर चाप बसवण्यासाठी एक नवे फिचर आणले आहे. त्यानुसार या फिचरचा उपयोग करुन युजर्सला खोट्या व्हिडिओच्या विरोधात तक्रार करता येणार आहे. त्यानंतर टिकटॉककडून खोटे व्हिडिओ त्यावरुन काढून टाकले जाणार आहेत. टिकटॉक व्यतिरिक्त फेसबुक आणि गुगलने यापूर्वीच खोट्या बातम्यांवर चाप बसवण्यासाठी काम करत आहेत. टिकटॉकने हे फिचर अॅपच्या आतमध्येच इंटीग्रेट केले असून युजर्सला कोणत्याही वेळी खोटा व्हिडिओ पाहिल्यानंतर रिपोर्ट करता येणार आहे.

टिकटॉकने त्यांच्या एका ब्लॉक मधून याबाबत अधिक माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच टिकटॉक हे सर्वाधिक वेळा डाउनलोड केले जाणाऱ्या अॅपचा रेकॉर्ड तोडला आहे. सध्या टिकटॉकचे जगभरात 2 अरब पेक्षा अधिक युजर्स आहेत. टिकटॉक युजर हे इन-अॅप रिपोर्टिंग फिचर हे मिसलिडींग इंफोर्मेशन कॅटेगरी येथे स्पॉट करु शकणार आहे. कोरोना व्हायरस संबंधित खोटी माहिती किंवा व्हिडिओची लगेच तक्रार करता येणार आहे.(Popular Google Doodle Games: गुगल आज घेऊन आलय Rockmore चं म्युझिकल डुडल; घरी बसल्या असा खेळा हा मजेदार खेळ)

 दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 10 हजाराच्या पुढे गेला आहे. त्यामुळे कोरोनाची सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून नागरिकांनी स्वत:ची काळजी घेण्यासोबत परिवाराची सुद्धा काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. तर TikTok ने महाराष्ट्र सरकारला तब्बल 5 कोटींची मदत केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले होते.