Stay and Play at Home Popular Google Doodle Game Rockmore (Photo Credits: Google)

Popular Google Doodle Games च्या सिरीजमध्ये गुगल आज सर्वांसाठी चौथे डूडल घेऊन आलं आहे. कोविड-19 पासून बचाव करण्यासाठी, गुगलने लोकांना डूडलद्वारे घरी राहण्यास सांगितले. गुगलने आपल्या जुन्या आणि लोकप्रिय डुडल्सच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला आहे. 2016 च्या क्लारा रॉकमोर बनविलेले डूडल आज गुगलने लोकांसमोर सादर केले आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाउनमुळे घरात अडकलेल्या युजर्सचे थोडे मनोरंजन करण्यासाठी सध्या गुगलकडून हे खास प्रयत्न केले जात आहेत. हे खेळणे एकदम सोप्पे आणि मजेदार आहे.रॉकमोर हा एक संगीत खेळ आहे आणि आपण त्यात संगीत देखील तयार करू शकता. गुगल कडून हा गेम पुन्हा लॉन्च करताना Google Doodle ने दिलेल्या माहितीनुसार, घरी बसा आणि Rockmore (2016) चा आनंद लुटा असे म्हटले आहे. (Popular Google Doodle Games च्या सीरीजमध्ये आज Fischinger चं म्युझिकल डुडल; असा खेळा हा गेम!)

हा खेळ लॉकडाउन दरम्यान घरी बसलेल्या लोकांचा कंटाळा दूर करण्यासाठी पुरेसा मनोरंजक आहे. हा खेळ खेळण्यासाठी यूजर्सना त्यांचा माउस म्यूजिकल नोट्सवर घेऊन जायचा आहे आणि थेरमीनने म्युजिक वाजवायचे आहे. सुरुवातीला आपणास हा खेळ थोडा कठीण दिसेल पण नंतर आपणास खेळ समजल्यावर मजा येईल. क्लारा रॉकमोर यांनी पातळ हवेपासून संगीत बनविले. लहान वयातच वायोलिन वादक म्हणून प्रशिक्षण घेतल्यानंतरही शारीरिक तणावामुळे रॉकमोर यांनी अखेरीस वायोलिन वाजवणे सोडले. यामुळे त्यांना थेरमीनचा शोध करण्यास प्रेरित केले. थेरमीन हे एक जेश्चर-नियंत्रित इन्स्ट्रुमेंट आहे ज्याचे नाव त्याच्या शोधकर्ता, लियोन थेरेमिन यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, युजर्ससाठी लॉकडाउनमध्ये गुगल 10 जुन्या खेळांची सीरीज घेऊन येणार आहे. यापूर्वी कोविड योद्धांना सलाम करण्यासाठी आणि कोरोना व्हायरस बाबत जनजागृती करण्यासाठी खास सीरीज गुगल डुडलच्या माध्यमातून सादर केली होती.