Facebook Vs TikTok: फेसबुकला टक्कर देत टिकटॉक ठरले जगात सर्वाधिक डाऊनलोड होणारे 'नंबर वन अॅप'
Facebook Vs TikTok | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शॉर्ट-व्हिडिओ प्लॅटफॉर्म टिकटॉक (TikTok) ने फेसबुकला (Facebook) पाठीमागे टाकत जगभरात सर्वाधिक डाऊनलोड केले जाणारे क्रमांक एकचे सोशल मीडिया अॅप ठरले आहे. निक्केई एशियाच्या हवाल्याने वृत्तसंस्था आयएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, 2020 मध्ये डाऊनलोड (Downloaded App) करण्यात आलेल्या अॅपच्या एका जागतिक सर्व्हेक्षणने 2018 मध्ये पहिल्यांदा अभ्यास केला तेव्हा टीकटॉक हे सर्वात अव्वल स्थानी असल्याचे पाहायला मिळाले.

आयएनएसच्या वृत्तात म्हटले आहे की, टिकटॉक ची मूळ कंपनी असलेल्या बायटडान्स ने 2017 मध्ये शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्ममध्ये आंतरराष्ट्रीय व्हर्जन लॉन्च केले. तेव्हापासून फेसबुक, व्हाट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक मॅसेंजर या लोकप्रीय अॅप्सना पाठीमागे टाकले. विशेष म्हणजे यात सर्वाधिक अॅपचे मालकी हक्क फेसबुककडे आहेत. महामारी काळात अॅपची लोकप्रियता अधिकच वाढली. प्रामुख्याने अमेरिकेत. (हेही वाचा, अकोला: फेसबुकवरुन सेवानिवृत्त व्यक्तीला 57 लाखांना लुटलं; 25 कोटींचं आमिष पडलं महागात)

2121 च्या सुरुवातीला व्हॉट्सअँपने घोषणा केली होती की ते यूजर्स आणि कंपन्यांच्या संवादासंदर्भात मॅसेजिंग डेटा फेसबुकसोबत सामायिक करेन. दरम्यान, हॉट्सअॅपने दोस्त आणि कुटुंबीयांसोबत झालेल्या संवादाबाबतच्या माहितीचे संरक्षण करण्याचा वचन दिले आहे. दरम्यान, टिक टॉक, फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम यांप्रमाणे एक सोशल मीडिया अॅप असलेल्या टेलीग्राम या अॅपचा क्रमांक सातव्या स्थानी आहे. हे अॅप रशियात विकसीत झाले आहे. हे सध्यातरी अद्याप जर्मनीपूरतेच मर्यादित आहे. चीनचे लाईकी हे अॅप आठव्या क्रमांकावर आहे.