Tik Tok चे CEO केविन मेयर यांनी दिला पदाचा राजीनामा, हंगमी सीईओ यांची नियुक्ती
TikTok logo (Photo Credits: IANS)

टिकटॉकचे (TikTok) सीईओ केविन मेयर (Kevin A. Mayer) यांनी एकूण राजकीय चढउतारादरम्यानच त्यांचा पदाचा राजीनामा दिला आहे. यामध्ये अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या सरकारसोबत वाद, अमेरिकेत कंपनी विकण्याची चर्चा, भारतात अॅपवर बंदी अशा सारख्या घटनांचा समावेश आहे. केविन यांनी सहा महिन्याच्या आतमध्येच आपल्या सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी एका ई-मेलच्या माध्यमातून याची घोषणा केली होती. त्यावर गुरुवारी प्रथम फायनेंशियल टाइम्स यांची नजर पडली. (जगभरात 235 मिलियन Instagram, TikTok आणि YouTube Profiles चा डाटा लीक - रिपोर्ट)

रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, कंपनीचे जनरल मॅनेजर वनीस पपाज यांना तत्काळ प्रभावामुळे त्यांच्या जागी टिकटॉकचे हंगामी सीईओ पद देण्यात आले आहे. द वर्ज यांना दिल्या विधानात टिकटॉकच्या एका प्रवक्त्याने असे म्हटले की, आम्ही मानतो की गेल्या काही आठवड्यात राजकीय वातावरणात बदल झाला आहे. यामुळेच केविन यांनी हे पाऊल उचलले आहे. त्याचसोबत केविन यांच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो. केविन यांनी कंपनीसाठी दिलेल्या वेळेचे आभार मानतो. येत्या काळासाठी केविन यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत.

केविन यांनी त्यांच्या पत्रात असे लिहिले की, नुकत्याच काही आठवड्यात राजकीय वातावरणात बदल वेगाने झाल्याचे पहायला मिळाले आहेत. याची आवश्यकता कॉर्पोरेटच्या संरचनात्म परिवर्तनासह त्याच्या जागतिक भुमिकेवर पडेल. मी सर्वांना जड मानाने सांगू इच्छितो की मी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. (Zee5 HiPi शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म लॉन्च, युजर्सला TikTok ची कमतरता नाही जाणवणार)

तर टिकटॉकने ट्रम्प प्रशासनाच्या विरोधात अमेरिकेतील त्यांची मूळ कंपनी बाइटडांसह देवाणघेवाणीवर बंदी घातल्याने कार्यकारी आदेशासंबंधित एक गु्न्हा दाखल केला आहे. यानंतरच केविन यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.