TikTok | (Only representative image)

बच्चे कंपनीपासून ते अगदी ऐंशी वयवर्ष पार केलेल्या मंडळींपर्यंत सर्वांच्या गळ्यातला ताईत बनलेला ऍप म्हणजे टिक टॉक (Tik Tok) .भारतातसह जगभरात या ऍपची लोकप्रियता पाहायला मिळते. हा टिक टॉकचा हिट फंडा लक्षात घेऊन या ऍपची पालक कंपनी म्हणजे बाईट डान्स (Byte Dance)  ही येत्या काही दिवसात मोबाईल निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार असल्याची माहिती समोर येत आहे. बाईट डान्स कंपनी लवकरच एका नवा कोरा स्मार्टफोन मार्केट मध्ये लाँच करणार असून या मध्ये टिक टॉक समवेत बातम्या व गाण्यांचे बाईट कंपनीचे ऍप्स प्री लोडेड असणार आहेत.

Financial Times च्या माहितीनुसार बाईट डान्स कंपनीचे सीईओ झांग यिमिंग हे अनेक वर्षांपासून मोबाईल निर्मिती क्षेत्रात पदार्पण करू पाहत होते, त्यांच्या या इच्छेला आता मार्ग प्राप्त झाला आहे. बीजिंगच्या या मूळ कंपनीने अलीकडेच एका मोबाईल उत्पादक कंपनीसोबत आपला करार पूर्ण केला असून येत्या दिवसात टिक टॉकच्या या पालक कंपनीचा फोन मार्केट मध्ये पाहायला मिळू शकतो.

टिक टॉक या ऍपची लोकप्रियता आता भारत आणि अमेरिकेत अति उच्च स्थानी आहे .मात्र मागील काही काळात टिक टॉक वरून अश्लीलतेला प्रोत्साहन मिळतो असे कारण देऊन भारतात या ऍपवर बंदी आणण्यात आली होती. तसेच मोबाइलच्या स्पर्धेत अगोदरच ख्यातनाम कंपनींचे वर्चस्व असल्याने बाईट डान्स कंपनीला पुरेपूर तयारी करण्याची गरज असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. Tik Tok: घरबसल्या यूजर्सला मिळणार 1 लाख रुपये कमविण्याची सुवर्णसंधी

सध्या मार्केट मध्ये चर्चित असणाऱ्या शाओमी, विवो, वन प्लस, ओप्पो सारख्या चायनीझ मोबाइल कंपन्यांच्या स्पर्धेत हा मोबाइल असणार आहे. त्यामुळे मोबाइल बाजारपेठेतील स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.