Paytm (Photo Credits: IANS)

आजकाल खरेदी करण्यासाठी, ऑटो, कॅबचे भाडे देण्यासाठी किंवा कोणतंही पेमेंट, ट्रान्सॅक्शन  करण्यासाठी ऑनलाईन अॅपचा सर्रास वापर केला जातो. यातील एक अॅप म्हणजे पेटीएम (Paytm). मात्र सध्या पेटीएम वरुन कोणतंही ट्रान्सॅक्शन करण्यासाठी KYC करणे गरजेचे आहे. KYC करण्यासाठी केवळ आधार कार्डची गरज आहे. तसंच विशिष्ट दुकानांमध्ये Paytm KYC करुन देण्याची सोय देखील उपलब्ध आहे. मात्र याच गोष्टीचा फायदा घेत काही फ्रॉड्स ने डोके वर काढले आहे. हे लोकांना खोटे मेसेज पाठवून त्यांचे अकाऊंट रिकामे करत आहेत. (Paytm आणि Google Pay च्या माध्यमातून होतेय नागरिकांची फसवणूक, तुम्ही सावधगिरी बाळगा)

सामान्य नागरिकांना याचा फटका बसू नये म्हणून ठाणे पोलिसांनी ट्विट करत सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. यात Paytm KYC संदर्भात येणाऱ्या कोणत्याही SMS ला प्रतिसाद देऊ नका, असे सांगण्यात आले आहे. Paytm KYC समाप्त झाल्यास 8101904723 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा अन्यथा 24 तासांत अकाऊंट ब्लॉक होईल, असा SMS नागरिकांना केला जात आहे. अशा प्रकारच्या SMS ला बळी पडून नका. तुमची फसवणूक होऊ शकते, असे सांगण्यात आलेले आहे. (Paytm युजर्सला झटका, वॉलेटमध्ये पैसे भरणे होणार महाग)

Thane City Police Tweet:

या fake sms मुळे युजर्सची फसवणूक होऊ नये म्हणून पेटीएमचे फाऊंटर विजय शेखर यांनी देखील ट्विट केले आहे. कंपनीच्या नावाने खोटे मेसेज, मेल किंवा कंपनीचा अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या फ्रॉड्सपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कृपया तुमचे पेटीएम अकाऊंट बंद करणे किंवा KYC करण्याबद्दल लिहिले असेल अशा प्रकारच्या खोट्या SMS वर विश्वास ठेवू नका. तो फ्रॉड आहे, असे त्यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.