Paytm युजर्सला झटका, वॉलेटमध्ये पैसे भरणे होणार महाग
प्रतिकात्मक फोटो (File Photo)

पेटीएम युजर्सना मोठा झटका बसणार आहे. कारण आता पेटीएमच्या वॉलेटमध्ये पैसे भरणे महागणार आहे. त्यानुसार क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेटीएमच्या वॉलेटमध्ये 10 हजारांपेक्षा अधिक पैसे जमा केल्यास त्यावर 2 टक्के शुल्क आकारले जाणार आहेत. मात्र या युजरला अतिरक्त शुल्काचा त्रास सोसावा लागणार आहे. याबाबत पेटीएमने अधिक माहिती दिली असून पेटीएमच्या वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डने 10 हजार पैसे भरल्यास कमीतकमी 200 रुपयांचा अतिरिक्त शुल्क द्यावा लागणार आहे. सध्या पेटीएमचे कोटीपेक्षा अधिक युजर्सची संख्या आहे.

डेबिट कार्ड किंवा UPI च्या माध्यमातून पेटीएम वॉलेटमध्ये पैसे भरणे निशुल्क असणार आहे. याप्रकरणाची माहिती देणाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, कंपनीने घेतलेला हा निर्णय व्यवहारावरील खर्च वाचवण्यासाठी वाढवला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 10 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम असल्यास त्या व्यवहाराच्या एकूण रक्कमेवर 1.75 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे.(Paytm आणि Google Pay च्या माध्यमातून होतेय नागरिकांची फसवणूक, तुम्ही सावधगिरी बाळगा)

 यापूर्वी सुद्धा पेटीएमने अशा प्रकारच्या गोष्टीचा विचार केल्याची ही पहिली वेळ नाही. एक वर्षापूर्वी, त्यांनी अशी फी आकारण्याचा विचार केला, परंतु त्याची अंमलबजावणी केली नाही. या बदलांवर युजर्स काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कारण बरेच युजर्स इतर क्रेडिट टॅक्ससाठी पैसे भरण्यासाठी त्यांच्या क्रेडिट कार्डमधून टॅक्सी त्यांच्या पेटीएम वॉलेटमध्ये लोड करतात.