PUBG Mobile गेममध्ये दिसणार Tesla कंपनीच्या कार
PUBG Mobile | (Photo Credits-Twitter)

Krafton आणि Tencent ची भागीदारी असलेल्या मूळ पबजी गेम मध्ये आता जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाच्या कार दिसणार आहेत. Tesla आणि PUBG Mobile यांच्यात नुकताच याबाबत एक करार झाला. PUBG Mobile इंडिया गेम भारतात प्रचंड लोकप्रिय होता. काही कारणामुळे भारतात या गेमला बंदी घालण्यात आली. त्यानंतर काही दिवसांतच Battlegrounds Mobile India या भारतीय व्हर्जनमध्ये या गेमने भारतात प्रवेश केला. आता तर Tesla आणि PUBG Mobile यांच्यात एक करार झाल्याने या गेममधील काही फिचर्स आणखी धमाकेदार होणार आहेत.

प्राप्त माहितीनुसार,  Tesla आणि PUBG Mobile यांच्यात झालेल्या करारानुसार टेस्लाच्या कार पबजी गेममध्ये दिसतील. हा गेम खेळणाऱ्या युजर्सला टेस्लाची कार खेळात वापरता येऊ शकते. याशिवाय टेस्ला कंपनीची आणखीही काही उत्पादने या गेममध्ये पाहायला मिळतील. कंपनीने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. दरम्यान, टेस्ला कंपनीची कोणती उत्पादने या गेममध्ये येतील याबाबत स्पष्ट माहती PUBG Mobile कंपनीने अद्याप दिली नाही. परंतू, टेस्लाच्या इलेक्ट्रीक कार या गेममध्ये दिसण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Battlegrounds Mobile India चाहत्यांसाठी खूशखबर; बेटलग्राऊंड मोबाईल इंडिया Google Play Store वर Pre-Registered Users साठी उपलब्ध)

ट्विट

टेस्ला कंपनीकडे Model S, Model X, Model 3 आणि Model Y अशा एकापेक्षा एक शानदार कार आहेत. यासोबतच टेस्लाने अगदी अलिकडेच Tesla Model S Plaid कारही बाजारात आणली आहे. Tesla Model S Plaid ही जगातील सर्वात फास्ट इलेक्ट्रिक सेडान कार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे ही कारही पबजीच्या व्हर्नमध्ये झळकण्याची शक्यता आहे. दरम्यान, पबजीच्या गेममध्ये या कार झळकणार हे खरं असलं तरी त्याची मजा Battlegrounds Mobile India या भारतीय व्हर्जनमध्ये घेता येणार की नाही याबाबत मात्र अद्याप स्पष्टता नाही.