यंदाची दिवाळी होणार जोरात, 'या' टॉप स्मार्टफोनवर मिळतेय भरघोस सूट
फोटो सौजन्य- ANI

ऑनलाईन वस्तूंच्या खरेदी- विक्रीसाठी जगभर प्रसिद्ध असणारी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट कंपनी पुन्हा एकदा त्यांच्या ग्राहकांसाठी यंदाची दिवाळी जोरात साजरी व्हावी यासाठी सुपर धमाकेदार सेल घेऊन आली आहे. तर या सेलमध्ये वस्तूंवर भरघोस सूट देण्यात आली असून वस्तूंची खरेदी- विक्रीसुद्धा करता येणार आहे. तर पाहूया अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर कोणत्या स्मार्टफोनवर भरघोस सूट देण्यात आली आहे.

अॅमेझॉन ग्रेस्ट इंडियन फेस्टिवल सेल-

iPhoneX : या स्मार्टफोनची मूळ किंमत 91,9000 एवढी आहे. मात्र या सेलच्या माध्यमातून त्यावर 20,391 रुपयांची सूट मिळणार असून तो 74,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. तसेच आयसीआयसीआय आणि सीटी बँकेच्या कार्डावरुन मोबाईल खरेदी केल्यास त्यावर 10 टक्के सूट मिळणार आहे. सोबतच कॅशबॅकची सुविधाही देण्यात आली आहे.

RedmiY2 : RedmiY2 या स्मार्टफोनला 3 जीबी रॅम देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनवर वॉरंटी 3 जीबीसाठी 9,000 रुपये तर 4 जीबीसाठी 12,000 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे 8,600 रुपयांपर्यंत ऐक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. एवढच नसून 4,000 रुपये किंमतीची फ्री स्क्रीन रिप्लेसमेंटची सोय करुन देण्यात आली आहे.

Redmi6A : ग्राहकांना हा फोन चालू झालेल्या सेलमध्ये 5,999 रुपयांना विकत घेता येणार आहे. तसेच या फोन सोबत 2,000 रुपये किंमत असलेली फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट देण्यात येणार आहे. तर आयसीआयसीआय आणि सीटी बँकेच्या कार्डावरुन मोबाईल खरेदी केल्यास त्यावर 10 टक्के सूट मिळणार आहे. मात्र जियो धारकांना या स्मार्टफोनवर 2,200 रुपये कॅशबॅक मिळणार असून 100 जीबी अतिरिक्त नेटचा डेटा देण्यात येणार आहे.

फ्लिपकार्ट धमाका सेल-

Nokia 5.1 Plus: या स्मार्टफोनसाठी ग्राहकांना 10,499 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच 2,700 रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे. तर ऐक्ससेंज ऑफरमध्ये 9,750 रुपयांची सूट उपलब्ध आहे. त्यामुळे तो नो- कॉस्ट ईएमआयवर ही खरेदी करता येणार आहे. मात्र अॅक्सिस कार्डावर फोनची खरेदी केल्यास त्यावर 10 टक्के सूट मिळणार आहे.

Realme C1: हा स्मार्टफोन जियो धारकांना 4,450 रुपयांना मिळणार असून त्यावर 1.1 जीबी नेटचा डेटा देण्यात आला आहे. तर या स्मार्टफोनची किंमत 6,999 रुपये आहे.

Honor7A : ऑनलाईन खरेदी करणाऱ्या युझर्सना फ्लिपकार्टवरुन Honor7A हा स्मार्टफोनवर 3,000 रुपयांची सूट देण्यात आली असून तो 7,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.