कोरोना व्हायरस महामारी दरम्यान आता जगभरामध्ये लोकांना लॉकडाऊन व्हाव लागल्याने गूगलने त्यांच्या युजर्सचा हा वेळ घरातल्या मंडळींसोबत, मित्रपरिवारासोबत घालवण्यासाठी खास गूगल डुडल सीरीज आणली आहे. यामध्ये आज गूगलने 'लोकप्रिय Google डूडल गेम' सीरीज मध्ये हॅलोविन २०१६ (Halloween) हा गेम लॉन्च केला आहे. याआधी कोडिंग, क्रिकेट, फ़िशिंगर, रॉकमोर आणि गार्डन नोम , लेतोरिआ पाठोपाठ आज हॅलोविनचा युजर्सना पुन्हा आनंद लुटता येणार आहे. आजचा गेम हॅलोविनवर आधारित आहे. यामध्ये एका जादुगार मांजरीसोबत जादुच्या शाळेचं रक्षण करायचं आहे. हा एक अॅनिमेटेड गेम असून सोपा, सहज गेम खूपच एंगेजिंग आहे. यात मांजरीच्या हातात एक जादूई काठी आहे. जी भूतांना मारायला मदत करते.
हॅलोविन गूगल डुडल च्या या लॉकडाऊन काळातील आठवा सीरीज गेम आहे. आज 2016 च्या हॅलोविन डूडलच्या गेम सोबत खेळताना तुम्ही स्कूल ऑफ मॅजिकला वाचवू शकता. याकरिता तुमच्या मिशनवर फ्रेशमॅन फेलाईन मोमो ला फॉलो करू शकता. त्याला भूतांच्या डोक्यावर प्रतिकांच्या स्वरूपात स्वाईप केल्यानंतर शैतानी आत्म्यांपासून तुमची सुटका होण्यास मदत होते. तुम्ही जोरात त्याला आपटल्यास ते भूत मास्टर स्पेलबूक चोरत असतो त्यापासून दूर होतो. या खेळामध्ये 5 लेव्हल आहेत. त्यामुळे तुमचा वेळ आज आरामात या लेव्हल पूर्ण करण्यात जाऊ शकतो.
मॅजिक कॅट अॅकेडमी बनवणार्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी कॅट स्पेल कास्टिंग गेम साठी मोमो नावाच्या एका काळ्या मांजरीपासून मिळाली आहे. ही डुडलर जुलियाना चेन यांची आहे.
सध्या कोरोना व्हायरसच्या संकटामध्ये क्वारंटीन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या या विचित्र परिस्थितीमध्ये पझल्स, बोर्ड गेम्स खेळत अनेकजण वास्तविक जगात आणि अगदी व्हर्च्युअल जगात देखील टाईमपास करत आहेत. 27 एप्रिल पासून जगभरात लोकांचा हा होम क्वारंटीनचा काळ सुसह्य व्हावा म्हणून खास डूडल गेम्सची सीरीज लॉन्च करण्यात आली आहे. यामुळे आज दिवसभर काय करायचं? या प्रश्नाला उत्तर मिळू शकतं.