Google Doodle Cricket Game: कोरोना व्हायरसमुळे भारतामध्ये 24 मार्च पासून लॉकडाऊन सुरू आहे. दरम्यान महिनाभरापेक्षा अधिक दिवस देशात कडक संचारबंदीचे आदेश असल्याने आता लोकांना घरात बसणं कठीण झालं आहे. पण अशामध्येही लोकांना घरामध्येच गुंतवून ठेवण्यासाठी गूगल या जगभरातील अग्रगण्य सर्च इंजिनने 'लोकप्रिय Google डूडल गेम' सीरीज सुरू केली आहे. यामध्ये काही जुने खेळ पुन्हा खेळण्याची संधी मिळाली आहे. सध्या गूगलने एका थ्रोबॅक सीरीजमधून या खेळांना युजर्ससाठी पुन्हा सुरू केले आहे. आज 2017 सालचा लोकप्रिय क्रिकेटचा खेळ गूगल डुडलच्या माध्यमातून पुन्हा सुरू करण्यात आला आहे. यामध्ये 10 जुने खेळ पुन्हा खेळण्याचा आनंद युजर्सना पुढील काही दिवस मिळणार आहे. लोकप्रिय Google डूडल गेम: गुगलचा प्रसिद्ध 'Coding' गेम खेळा आणि घरीच रहा.
गूगलने या खेळाला 2017 साली आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या सेलिब्रेशन दरम्यान लॉन्च केलं होतं. आता हा खेळ लॉकडाऊन दरम्यान कंटाळलेल्या भारतीय युजर्ससाठी पुन्हा सुरू करण्यात आला आहे. आता घरबसल्या पुन्हा युजर्स क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेऊ शकतात. या खेळामध्ये बॅट फ्लाय होत राहते पण तुम्हांला जेव्हा बॉल येईल तेव्हा ती फिरवणं गरजेचे आहे. प्रत्येक हिट नंतर तुम्हांला स्कोअर पाहता येईल. तुम्ही आऊट होत नाही तोपर्यंत तुम्हांला खेळता येऊ शकतं.
भारतामध्ये 24 मार्चपासून सुरू झालेला लॉकडाऊन आता 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. 3 मेनंतर लॉकडाऊनचं काय होणार? याबाबत अद्याप सरकारने कुठलीही माहिती दिलेली नाही. मात्र सद्यस्थिती पाहता ही परिस्थिती पुढील काही दिवस अशीच राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.