सावधान.. ऑनलाईन शॉपींग कंपन्या विकतायत चोरीचे मोबाईल, पस्तावण्यापूर्वीच शाहणे व्हा!
Stolen Mobile Phones | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Stolen Mobile Phones: मोबाईल खरेदीसाठी (Smartphone Shopping) तुम्ही जर ऑनलाईन शॉपींगला प्राधान्य देत असाल तर सावधान!. तुम्ही ऑनलाईन खरेदीसाठी (Online Shopping) निवडलेली साईट, त्याची वैधता आणि सुरक्षितता याबाबत आवश्यक ती सर्व खातरजमा करुन घ्या. अन्यथा तुमच्यावर पस्तावण्याची वेळ येऊ शकते. होय,ऑनलाईन शॉपींग कंपन्या (Online Shopping Company) विकतायत चोरीचे मोबाईल. बंगळुरु येथील अनेक ग्राहकांना नुकताच असाच एक अनुभव आला. सेक्टर-63 छिजारसी येथील एका मोबाईल शेरुमध्ये चोरी झाली. या दुकानातून चोरलेले सुमारे 250 मोबाईल फोन बंगळुरु येथील एका ऑनलाईन कंपनीने विकले. या साईटवरुन काही ग्राहकांनीही फोन विकत घेतले. दरम्यान, एका ग्राहकाचा फोन वाजला. त्याने फोन स्वीकारला तर पलीकडून पोलीस बोलत होते. पोलिसांचा फोन म्हणल्यावर हा ग्राहक आगोदरच अर्धा घाबरला. पण, त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली आणि झाला एका मोठ्या रॅकेटचा भांडाफोड. ज्यामुळे केवळ ग्राहकच नव्हे तर, पोलीसही हादरुन गेले. जाणून घ्या काय आहे प्रकरण.

फेज-3 पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा ऑनलाईन कंपनीकडून चोरीचे मोबाईल विकल्याचे प्रकरण पुढे आले. पोलिसांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, छिजारसी पुश्ता रोड येथील गौरव शर्मा यांचे मोबाईलचे शोरुम आहे. 17 डिसेंबरच्या रात्री अज्ञातांनी त्यांच्या शोरुमचे शटर तोडून आतील मोबाईल लंपास केले. ही घटना रात्री 2.30 ते 3.30च्या दरम्यान घडली. चोरांनी दुकाातील 250 मोबाईल चोरुन नेले होते. पोलिसांना मिलालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये 6 लोकांचे चेहरे समोर आले होते. (हेही वाचा, मोबाईल हरवलाय? सहजपणे शोधता येणार, गुगलचे नवे फिचर)

दरम्यान, चोरीचे हे मोबाईल बंगळुरु येथील ऑनलाईन शॉपींग कंपनीने विकले. महत्त्वाचे म्हणजे या साईटवरुन ग्राहक मोबाईल खरेदी करत होते. मात्र, त्यांना आपण मागवत असलेले मोबाईल चोरीचे असल्याची जरादेखील कल्पना नव्हती. केवळ स्वस्त मिळत आहेत म्हणून ते हे मोबाईल खरेदी करत होते. पण, ग्राहकांनी खरेदी केलेले मोबाईल जेव्हा सुरु केले तेव्हा त्यांना फेज-3 पोलीसांचे फोन यायाला सुरुवात झाली. (हेही वाचा, हरवलेला स्मार्टफोन Google Maps च्या मदतीने 'असा' शोधा; 4 सोप्या स्टेप्स)

एसएचओ अखिलेश त्रिपाठी यांनी सांगितले की, बंगळुरु येथील एक ऑनलाईन शॉपींग कंपनी चोरी केलेले मोबाईल विकते आहे. जेव्हा आयएमईआय चेक केल्यावर त्या फोनवर कॉल केल्यावर फोन वापरकर्त्यांनी सांगितले की आम्ही हे फोन ऑनलाईन मागवले आहेत. असे फोन विकणारी कंपनी कोणती आहे याचा तपास केला जात आहे. सर्व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई लवकरच केली जाईल, असेही त्रिपाठी यांनी सांगितले.