स्मार्टफोन (Smartphone) हा आपल्या आयुष्याचा अभिवाज्य भाग बनला आहे. दिवसातील रिकामा वेळ आपण शक्यतो आपल्या फोनसोबत घालवतो. स्मार्टफोन आपला सवंगडी झाला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण काही वेळ जरी फोन आपल्या नजरेआड झाला तरी आपण बैचेन होतो. मात्र कधी फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्या तुम्ही तो कसा शोधाल? हा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. तर Google Map च्या मदतीने तुम्ही हा फोन अगदी सहज शोधू शकाल. त्यासाठी या काही खास स्टेप्स आहेत. पासवर्ड, पिन किंवा पॅटर्न लॉक विसरल्यावर फोन अनलॉक कसा कराल ?
Google Map वरुन असा शोधा हरवलेला फोन
# गुगल मॅपच्या मदतीने हरवलेला फोन शोधण्यासाठी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हीटी असलेला मोबाईल, लॅपटॉप किंवा कंप्म्युटर असणे गरजेचे आहे. मोबाईलचे बिल कमी करण्यासाठी सोप्या '5' टिप्स !
# त्याचबरोबर Gmail अकाऊंटचा आयडी आणि पासवर्ड नीट लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
# सर्वप्रथम गुगलवर जावून www.maps.google.co.in टाईप करा. त्यानंतर Google Map ओपन होईल. त्यानंतर तिथे स्मार्टफोनशी लिंक असलेला गुगल आयडी टाका.
# साईन इन झाल्यानंतर उजव्या बाजूला 3 डॉट दिसतील. त्यावर क्लिक करा. तिथे तुम्हाला 'Your timeline' असा पर्याय दिसेल. तो पर्याय सिलेक्ट केल्यावर तुम्हाला ज्या दिवसाची लोकेशन हिस्ट्री पाहायची आहे तो दिवसा, महिना आणि वर्ष तिथे टाका. त्यानंतर सर्व लोकेशन हिस्ट्री वेळेनुसार पाहायला मिळेल.
हे फिचर तुम्ही कोणत्याही अॅनरॉईड फोनमधील Google Maps मध्ये अगदी सहज वापरु शकता. मात्र मोबाईलशी लिंक असलेला आयडीवरुनच गुगल मॅपवर साईन इन करा. त्याचबरोबर तुमच्या हरवलेल्या मोबाईलमध्ये लोकेशन सर्व्हीस फिचर ऑन असल्यावरच हे फिचर योग्यरीत्या काम करेल. या फिचरच्या योग्य वापरामुळे तुम्ही हरवलेल्या मोबाईलचे लोकेशन सहज ट्रॅक करु शकता.