स्मार्टफोन अनलॉक (Photo Credits: Pixabay)

आजकाल प्रत्येकाच्या मोबाईलला पासवर्ड, पिन किंवा पॅटर्न लॉक असतो आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ते महत्त्वाचे देखील आहे. पण पासवर्ड, पिन किंवा पॅटर्न विसलायत तर ? काय करावे हा प्रश्नच पडतो. पण तुमच्यावर अशी वेळ आली तर घाबरुन जावू नका. खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो केल्यास नक्कीच तुमचा स्मार्टफोन अनलॉक व्हायला मदत होईल. तर जाणून घेऊया या काही सोप्या स्टेप्स....

स्टेप 1 : स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटरवरुन https://myaccount.google.com/find-your-phone-guide या लिंकवर जा.

स्टेप 2 : त्यानंतर मोबाईलमध्ये असलेल्या गुगल अकाऊंटच्या मेल आयडीवर लॉगईन करा.

स्टेप 3 : लॉगईन केल्यानंतर त्या मेल आयडीशी कनेक्ट मोबाईलची यादी दिसेल. त्यातून तुम्हाला जो फोन अनलॉक करायचा असेल तो सिलेक्ट करा.

स्टेप 4 : त्यानंतर दुसऱ्या स्क्रीनवर Lock your phone चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

स्टेप 5 : मग विसरलेल्या पासवर्ड, पिन किंवा पॅटर्नऐवजी दुसरा पासवर्ड, पिन किंवा पॅटर्न सेट करा.

स्टेप 6 : पासवर्ड सेट करुन झाल्यावर खाली असलेल्या लॉक बटणावर क्लिक करा.

स्टेप 7 : त्यानंतर लॉक झालेल्या मोबाईलमध्ये नवीन सेट केलेला पासवर्ड, पिन किंवा पॅटर्न टाका. स्मार्टफोन अनलॉक होईल.

Ok Google चा वापर

जर तुमच्याकडे गुगल असिस्टंटचा योग्य प्रकारे सेटअप असेल तर तो यावेळी कामी येईल. त्यात Unlock with voice हे फिचर असते. हे फिचर तुमच्या जुन्या नोंद केलेल्या आवाजाच्या आधारे काम करते. हे फिचर जर चालू असेल तर स्मार्टफोन अनलॉक करण्यासाठी तुम्हाला फक्त Ok Google असे म्हणावे लागेल.