Smartphones Launch in November 2021: नोव्हेंबर महिन्यात भारतात लॉन्च होणार हे '4' स्मार्टफोन्स
JioPhone Next (Photo Credits: Reliance Jio)

देशात सणासुदीचा हंगाम सुरु झाला असून सर्व लोक याचा पुरेपूर आनंद घेत आहेत. या काळात नवीन प्रॉडक्ट लॉन्च केले जातात. जगभरातील स्मार्टफोन (Smartphone) निर्माते देखील त्यांचे नवीन जनरेशनचे स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. यापैकी काही स्मार्टफोन नोव्हेंबर (November) महिन्यात भारतात लॉन्च होणार आहेत. तर जाणून घेऊया नोव्हेंबर 2021 मध्ये लॉन्च होणाऱ्या टॉप स्मार्टफोन्सबद्दल... (Android आणि iOS च्या 'या' स्मार्टफोन्सवर 1 नोव्हेंबर पासून चालणार नाही WhatsApp; येथे पहा संपूर्ण यादी)

JioPhone Next:

JioPhone Next हा स्मार्टफोन जूनमध्ये रिलायन्सच्या Annual General Meeting 2021 मध्ये प्रदर्शित करण्यात आला. रिलायन्सने या नव्या जिओ स्मार्टफोनची निर्मिती Google सोबत मिळून केली आहे. हा स्मार्टफोन 4 नोव्हेंबर रोजी रिलीज होईल. या स्मार्टफोनमध्ये  Pragati ऑपरेटिंग सिस्टिम दिली आहे. अॅनरॉईड वर आधारित या स्मार्टफोनमध्ये व्हॉइस असिस्टंट, रीड आऊट लाऊड, ट्रान्सलेट फीचर्स, सिंगल रिअर कॅमेरा आणि एआर फिल्टर्स देण्यात आले आहेत. (JioPhone Next स्मार्टफोन लॉन्च; 4 नोव्हेंबर पासून सेलला सुरुवात)

Asus 8Z:

असूस 8Z स्मार्टफोन ऑक्टोबरमध्ये भारतात पदार्पण करेल अशी अपेक्षा होती. परंतु हा स्मार्टफोन लॉन्च होण्याची चिन्हे दिसत नव्हती. हा फोन नोव्हेंबरमध्ये भारतीय बाजारात येण्याचा अंदाज आहे. फ्लॅगशिप Asus 8Z मध्ये AMOLED पॅनल, प्रीमियम स्नॅपड्रॅगन 888 SoC प्रोसेसर, 64 MP ड्युअल रियर कॅमेरा, Dirac HD साउंडसह ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स देण्यात आले आहेत. तसंच क्विक चार्ज 4.0 सपोर्टसह 4,000mAh बॅटरी सुद्धा दिली आहे.

OnePlus 9RT:

वन प्लसचा 9RT हा स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 888 SoC प्रोसेसर, 12GB पर्यंत रॅम आणि 120Hz चा Samsung E4 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. OnePlus 9RT ची भारतातील किंमत 40,000 ते 44,000 रुपयांपर्यंत असू शकते.

Redmi Note 11:

रेडमी नोट 11 स्मार्टफोन 28 ऑक्टोबर रोजी चीनमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. रेडमी नोट 11 पुढील महिन्यात भारतात येऊ शकते. या स्मार्टफोनमध्ये 90Hz चा डिस्प्ले, मीडियाटेक चा 810 SoC प्रोसेसर, 8GB पर्यंत रॅम, MIUI 12.5 आधारित Android 11 आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मोठी 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

तुम्ही जर नवा स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर यापैकी एखादा पर्याय नक्कीच विचार करु शकता.