Surya Grahan June 2020 Date: 21 जून दिवशी दिसणारे कंकणाकृती सूर्यग्रहण कधी, कुठे, कसं पाहु शकाल?
Solar Eclipse (Photo Credits: Pixabay)

जून महिन्यात 6 तारखेला छायाकल्प चंद्रग्रहण ( penumbral lunar eclipse) पाहिल्यानंतर आता या महिन्यात 21 जून दिवशी सूर्यग्रहण पाहता येणार आहे. हे सूर्यग्रहण कंकणाकृती (Ring Of Fire)आहे. दरम्यान भारतामध्ये प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये हे सूर्यग्रहण कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे तर महाराष्ट्रामध्ये हे खंडग्रास सुर्यग्रहणाच्या स्वरूपात पाहता येणार आहे. कंकणाकृती सूर्यग्रहणामध्ये चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो . या सूर्यग्रहणात चंद्र जास्त अंतरावर असल्यामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशावेळी सूर्याची वर्तुळाकार कडा चंद्राच्या मागे निर्माण होते.

21 जून दिवशी दिसणार्‍या सूर्यग्रहणाची तारीख आणि वेळ?

21 जून दिवशी दिसणारं सूर्यग्रहण (Annular Solar Eclipse) हे भारतीय वेळेनुसार, सकाळी 09:15 वाजता सुरू होणार आहे. हे दुपारी 12:10 वाजता सर्वोच्च स्थितीमध्ये असेल तर 15:04 वाजता हे संपणार आहे. म्हणजेच हे सूर्यग्रहण 6 तास चालणार आहे.

जगभरातून कुठे दिसणार सूर्यग्रहण?

21 जूनचं कंकणाकृती सूर्यग्रहण साऊथ / ईस्ट युरोप, आशिया, आफ्रिका, पॅसिफिक आणि इंडियन ओशन आणि ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागामध्ये दिसणार आहे.  (Eclipses of 2020: भारतीय खगोलप्रेमींसाठी आगामी वर्षभरात 6 ग्रहणं, सुपरमून, ब्ल्यू मून अनुभवता येणार; पहिलं चंद्रग्रहण 10 जानेवारी दिवशी!)

सूर्यग्रहण कसं बघाल?

सूर्यग्रहणाच्या काळात सूर्याकडे थेट डोळ्यांनी बघू नये असे सांगितले जाते. त्यामुळे सुरक्षेची काळजी घेऊन UV filtered eclipse glasses चा वापर करून पहावं. अनेकजण गिफ्ट रॅपिंग पेपरच्या माध्यममातून सूर्यग्रहण पाहतात. आता ऑनलाईन माध्यमातूनही सूर्यग्रहण पाहता येऊ शकतं.

भारतामध्ये ग्रहण या घटनेकडे खगोलीय घटना म्हणून पाहण्यापेक्षा त्याच्यासोबत असलेल्या समज-गैरसमज यामधून अधिक पाहिलं जातं. पण तुम्ही खरंच या अद्भुत, दुर्मिळ घटनांंबाबत उत्सुक असाल तर 21 जूनच्या दुपारी सूर्यग्रहणाचा आनंद नक्की घ्या.