Strawberry Moon 2021 Visibility Time in India: 'स्ट्रॉबेरी मून' कुठे, कधी आणि कसे पाहू शकाल? जाणून घ्या याबद्दल सविस्तर 
स्ट्रॉबेरी मून 2021 (Photo Credits: Pixabay)

गेल्या महिन्यातील सुपरमूननंतर अंतराळातील जगामध्ये रस असणाऱ्यांसाठी 24 जून हा खास दिवस आहे. आज चंद्र वेगळ्या प्रकारे आकाशात दिसेल. तसेच त्याचा आकार पूर्वीपेक्षा मोठा असेल आणि रंग गुलाबी होईल ज्याला 'स्ट्रॉबेरी मून' असे नाव देण्यात आले आहे.ग्रीष्म संक्रांति नंतर येणाऱ्या पहिल्या पौर्णिमेच्या रात्री स्ट्रॉबेरी मून दिसणे ही एक अद्भुत घटना आहे.हे वर्षाचे शेवटचे सुपर मून असेल या नंतर पुढच्या वर्षी 14 जून 2022 ला आपल्याला सुपर मून पहायला मिळणार आहे.केशरी रंगासह स्ट्रॉबेरी चंद्र त्याच्या कक्षा मध्ये पृथ्वीच्या अगदी जवळ राहून रात्रीचे आकाश उजळवणार आहे. (Most Expensive Thing: पृथ्वीवर येणार मंगळ ग्रहावरील माती; NASA खर्च करणार तब्बल 9 अब्ज डॉलर्स, सर्वात महागडी गोष्ट )

स्ट्रॉबेरी मून भारतात कधी बघितला जाऊ शकतो?

स्ट्रॉबेरी मून रात्री 12:09 पूर्ण रोषणाई मिळवू शकेल आणि होरिझॉन च्या वर आल्यानंतर तो आपल्या संपूर्ण रोषणाईसह दिसून येईल. तथापि, हे भारतात स्पष्टपणे दिसून येणार नाही.रोममधील इव्हेंटचे लाइव्ह फीड व्हर्च्युअल टेलीस्कोप प्रोजेक्टद्वारे 3PM ET / 12: 30PM IST वर प्रसारित केले जाईल.

कसे पडले हे नाव? 

नासाच्या शास्त्रज्ञांच्या मते, दरवर्षी 24 जूनला चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरत असतांना त्याच्या लंबवर्तुळाकार कक्षात येतो. यावेळी चंद्र आकारात मोठा दिसतो. उत्तर अमेरिकेच्या अल्गॉनक्विन आदिवसींनी त्याचे नाव स्ट्रॉबेरी मून ठेवले.या दिवशी दिसणाऱ्या चंद्राला युरोपमधील रोज मून देखील म्हणतात. उत्तर गोलार्धात याला हॉट मून असे म्हणतात कारण हे भूमध्य रेखाच्या उत्तरेस उन्हाळ्याच्या हंगामाची सुरूवात मानली जाते.

स्ट्रॉबेरी मून अशा स्थितीला म्हणतात जेव्हा चंद्राचा पृष्ठभाग पूर्णतः लाल होतो.शास्त्रज्ञांच्या मते रोजच्या तुलनेत आजचा दिवशी चंद्र सूर्याच्या अधिक जवळ असेल.तसेच ज्योतिषशास्त्रात जूनच्या या पौर्णिमेला खूप चांगला दिवस मानला जातो. धर्मग्रंथांमध्ये, गंगा स्नान, पूर्वजांची पूजा करणे आणि दान करण्याचा दिवस मानला जातो. या दिवशी चंद्र त्याच्या 16व्या कलेत असणार आहे.गेल्या काही दिवसात सुपर मून, ब्लड मून, चंद्र ग्रहण तसंच रिंग्ज ऑफ फायर म्हणजेच सूर्यग्रहण दिसलं होतं. तसेच आज 24 जूनला दिसणारा स्ट्रॉबेरी मून देखील खास असेल.स्ट्रॉबेरी मूननंतर 24 जुलैला बक मून आणि 22 ऑगस्टला स्टर्जजन मून दिसणार आहे.