सौम्य स्वरूपाचं एक सौर वादळ धडकल्याचे काही दिवस उलटताच आता अजून एका सौर वादळाचा (Solar Storm) धोका नासा (NASA) कडून वर्तवण्यात आला आहे. येत्या 1-2 दिवसामध्ये त्याचा फटका पृथ्वीला बसू शकतो असा अंदाज आहे. 19 एप्रिलला वादळ येऊ शकतं आणि 20 एप्रिलला त्याचा पृथ्वीवर परिणाम दिसू शकतो असा अंदाज आहे. Space Weather Woman म्हणून ओळख असलेल्या Tamitha Skov यांनी याबाबतचे ट्वीट केले आहे. भौतिकशास्त्रज्ञ असलेल्या Tamitha Skov अवकाशातील हवामानाचा अभ्यास करतात.
SpaceWeather.com ने आपल्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, "सूर्याच्या ईशान्य बाजूस एक नवीन आणि मोठा सनस्पॉट वर येत आहे, शक्यतो तोच सनस्पॉट ज्याने शनिवारी सूर्याच्या दूरच्या बाजूने गरम गोळा अवकाशात टाकला." अहवालानुसार, या सनस्पॉटमुळे येत्या काही दिवसांत पृथ्वीच्या पृष्ठभागावर मोठे बदल दिसून येतील.
सनस्पॉटचा स्फोट खतरनाक असेलच असं काही नाही. प्रामुख्याने त्याचा परिणाम हा सनस्पॉटच्या आकार आणि त्याच्या चुंबकीय क्षेत्राच्या परिघावर अवलंबून आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या स्फोटाने पुष्कळ कोरोनल मास इजेक्शन कण सोडले गेले आहेत. हा स्फोट इतका मोठा होता की सूर्याच्या पृष्ठभागावरील वस्तुमान अवकाशात उडून गेल्याचे हे संकेत आहे. जर हा स्फोट पृथ्वीकडे तोंड करून झाला असता तर त्यामुळे पृथ्वीवर G5 वर्गाचे सौर वादळ निर्माण झाले असते.
Ready for #aurora? A #solarstorm direct hit is coming. NASA predicts impact 20 April. Additional glancing storms launched earlier mean activity could pick up late on April 19. Expect extended aurora at high latitudes with good chance of views down to mid-latitudes by the 20th. pic.twitter.com/GV8tMf55k3
— Dr. Tamitha Skov (@TamithaSkov) April 17, 2023
सौर तुफान उपग्रह, मोबाईल नेटवर्क, इंटरनेट कनेक्शन यांना विस्कळीत करू शकतं. अंदाजानुसार हे तुफान पाव्र ग्रिडचं देखील नुकसान करू शकतं. या तुफानाचा थेट मानवी जीवनावर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. पण विद्युत सेवेवर परिणाम झाल्यास आपत्कालीन सेवांवर परिणामाची शक्यता आहे. Solar Eclipse in April 2023: जगभरात दिसणाऱ्या वर्षाच्या पहिल्या सूर्यग्रहणाची तारीख, वेळेसह संपूर्ण माहिती, जाणून घ्या .
पृथ्वीवर अशाप्रकारचे सौर वादळ 1859 साली आल्याची नोंद आहे.