Chandrayaan-3 | (Photo Credits: Twitter )

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थातच इस्त्रो (ISRO) ने चांद्रमोहीम फत्ते केली. अवकाशात सोडलेले चांद्रयान-3 चंद्रावर यशस्वी उतरल्याने ही मोहीम यशस्वी झाली. अंगावर रोमांच उभे करणारा आणि प्रत्येक देशवासीयाचा उर अभिमानाने भरुन येणाऱ्या या क्षणाचा एक व्हिडिओ इस्त्रोने आपल्या ट्विटर हँडलवरुन अपलोड केला आहे. हा व्हिडिओ चांद्रयान-3 चंद्रावर लँड होतानाच्या काही अंतिम क्षणांचा आहे. आपणही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.

चंद्रावर यान पाठवणाऱ्या काही मोजक्याच देशांपैकी एक देश भारत ठरला आहे. भारताने बुधवारी ही अत्यंत विक्रमी कामगिरी केली. आतापर्यंत ही कामगिरी केवळ तीन देशांनी केली होती. त्यात भारत आता चौथ्या क्रमांकावरचा देश ठरला आहे. तसेच, पृथ्वीच्या नैसर्गिक दक्षिण ध्रुवावर पाहोचणारा भारता हा पहिलाच देश बनला आहे.

ट्विट

चांद्रयान-3 ने बुधवारी संध्याकाळी 6.04 वाजता चंद्रावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग केले. ज्यामुळे भारत चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरणारा चौथा देश बनला. प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागाचा त्याच्या पेलोड APXS-अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर द्वारे चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करेल. ज्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागाची रासायनिक आणि खनिज रचना अधिक समज वाढेल.