भारताच्या बाजूला असलेल्या चीन (China) देशाने नुकतेच चंद्रावर आपले चांग ई-5 (Chang'e-5) नावाचे एक चंद्रयान पाठवले आहे. चीनचे हे मिशन आतापर्यंत यशस्वी झाले आहे. तर चंद्रावरील नमूने एकत्रित केल्यानंतर ते चंद्रयान धरतीवर येण्यास रवाना झाले आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरुन रवाना होण्यापूर्वी चीनच्या अंतरिक्षयानच्या लँडरने तेथे आपला चीनी ध्वज फडकवला आहे. चीनच्या राष्ट्रीय आंतराळ प्रशासनाने या मिशन बद्दल सांगत असे म्हटले की, चांग ई-5 च्या एस्केंडर ने चंद्रावर लँडिंग केल्यानंतर 19 तासाच्या आत मध्ये नमूने एकत्रित केले होते.
चीनी सरकारने ही माहिती देत असे म्हटले की, 1970 नंतर आता चंद्रावरील नमून एकत्रित करण्यासाठी हे अभियान पार पाडले गेले. चीनच्या राष्ट्रीय आंतराळ प्रशासनाकडून असे सांगितले गेले की, चांग ई-5 आंतराळयान निर्धारित जागेवर गेल्या मंगळवारी रात्री 11 वाजल्यानंतर काही वेळाने यशस्वीपणे तेथे लँड झाले.(Cow Dung Chip: फोनमधून निघणारे रेडीयेशण कमी करते गाईच्या शेणापासून बनवलेली 'चिप'; राष्ट्रीय 'कामधेनु' आयोगाची माहिती)
Çin Ulusal Uzay İdaresi (CNSA), topladığı toprak örnekleriyle Dünya'ya gelmek üzere Ay'dan ayrılan Chang'e 5'in, Ay'a diktiği Çin bayrağının fotoğraflarını yayımladı.
📎https://t.co/HU0NJO788b pic.twitter.com/qgv5rky6Td
— Ajans Haber (@AjansHaberResmi) December 4, 2020
लँडरचे 24 नोव्हेंबरला हैनान द्वीप येथून उड्डाण करण्यात आले होते. चंद्रावर पाठवल्यानंतर लँडर दोन आठवड्यात दोन दिवसात दोन किलोग्रॅमचे दगड आणि धुळीचे नमूने एकत्रित करणार आहे. त्यानंतर नमुने कक्षेत पाठवले जाणार असून तेथून ते रिटर्न कॅप्सूलच्या माध्यमातून पृथ्यीवर आणण्यात येणार आहे.(Venus Is A Russian Planet? शुक्र हा रशियन ग्रह असल्याचा रशिया स्पेस एजन्सीचा दावा, वाचा सविस्तर)