Tree of 40 Fruit | (Photo credit: archived, edited, representative image)

हे जग अद्भूत आहे. ऐकावे ते नवलच वाटावे अशी स्थिती. आजवर आपल्याला इतकेच माहिती की, एक झाड हे केवळ एकाच प्रकारचे फळ देते. जसे की, अंबा, फण, चिक्कू, पेरु, चिंच, वैगेर वैगेरे. पण, जगात अशाही प्रकारचे एक झाड आहे, ज्या झाडावर चक्क 40 प्रकारची फळं लागतात. होय, अमेरिका देशातील व्हिज्युअल आर्ट्स प्रोफेसर (Visual Arts Professor) वॅन अकेन (Van Aken) महोदयांनी अद्भूत असे हे झाड तयार केले आहे. हे अनोखे झाड ट्री ऑफ 40 (Tree of 40 Fruit) नावाने प्रसिद्ध आहे. या झाडावर द्राक्षं, बोरं, चेरी, नेक्टराइन यांसारखी अनेक फळं लगडलेली पाहायला मिळतात.

आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही या झाडाची दखल घेतली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या झाडाची किंमत 19 लाख रुपये इतकी आहे. या झाडाबाबत सांगितली जाणारी कथा अशी की, हे झाड ज्या बागेमध्ये आहे ती बाग अपूऱ्या निधीमुळे मोडकळीस आली होती. तिची डागडूजी करण्यासही निधी नव्हता. त्यामुळे हा बगीचा बंद होणार होता. या बागेमध्ये काही दुर्मिळ वनस्पतीही होत्या. दरम्यान, ही बाब प्रोफेसर वॅन न यांना समजली. प्रोफेसर वॅन यांनी ग्राफ्टिंग या तांत्रिक मदतीच्या आधारे झाडांना उगवण्यास मदत केली. प्रोफेसर वॅन यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. त्यामुळे वॅन यांना शेती, झाडे, पर्यावरण आदी विषयांत रुची आहे. त्यांनी ही बाग भाडेतत्वावर घेतली आणि ग्राफ्टिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने ट्री ऑफ 40 (Tree of 40 Fruit) जन्माला घातले. (हेही वाचा, Plastic Waste Management: कचऱ्यातून उडणार विमान, टाकाऊ प्लास्टिकपासून होणार इंधन निर्मिती)

ग्राफ्टिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने झाड तयार करण्यासाठी झाडाच्या काही फांद्यांची छाटणी हिवाळ्यात केली जाते. छाटणी केलेल्या फांद्यांच्या जागेवर छिद्र पाडून इतर झाडांच्या फआंद्यांचे कलम तेथे लावले जाते. जेथे या फांद्या जोडल्या जातात तिथे पोषण तत्व असलेले लेप लाऊन पट्टी बांधली जाते. त्यानंतर काही काळात ही फांदी मूळ झाडाशी (ज्याच्यावर कलम केले जाते) एकरुप होते. पुढे त्याला फळे, फुले येतात.