State Bank of India (SBI) | (Photo Credits: PTI/File)

स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (State Bank Of India) युजर्सकडून सध्या बॅंकेच्या योनो अ‍ॅप (Yono App) सुरू नसल्याच्या तक्रारी येत आहेत. ट्वीटरवर योनो अ‍ॅप (You Only Need One App) डाऊन अशा ट्वीटसचा सध्या भडिमार सुरू आहे. मागील 48 तासांपासून एसबीआयचे योनो अ‍ॅप काम करत नसल्याचं सांगितलं जात आहे. सोबतच स्टेट बॅंक ऑफ इंडियाची मोबाईल आणि इंटरनेट बॅंकिंग सर्व्हिस देखील ठप्प असल्याचं सांगितलं जात आहे. ग्राहकांनी केलेल्या तक्रारीनुसार, "M005" हा एरर कोड दाखवत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

ट्वीटरवर योनो अ‍ॅपबद्दल तकारींचा पाढा वाचताना अनेकांनी संपातजनक ट्वीट केली आहेत. यामध्ये एका युजरने 'योनो अ‍ॅप सतत मेन्टेनंस चं कारण देत वेळेवर काम करत नाही लवकर दोष दूर करा असं त्याने म्हटलं आहे.

योनो अ‍ॅप डाऊनची काही ट्वीट्स

नुकतीच आरबीआय कडून एचडीएफसी या खाजगी बॅंकेच्या तांत्रिक दोषांमुळे सुरळित न चालणारी डिजिटल बॅंकिंग सेवा पाहता त्यांना नवी क्रेडीट कार्ड्स न देण्याची नोटीस दिली आहे. पण एसबीआय वर तशी कारवाई का केली जात नाही. असा सवाल देखील विचारला जात आहे. RBI कडून HDFC Bank ला नवे Credit Card Customers जोडण्याला, डिजिटल बिझनेस अ‍ॅक्टिव्हिटीजना तूर्तास स्थगितीचा सल्ला.

दरम्यान एसबीआय कडून त्यांच्या योनो अ‍ॅप डाऊन किंवाऑनलाईन सेवा विस्कळीत असल्याच्या बातमीची पुष्टी करण्यात आलेली नाही. अनेकांना ट्वीटरवर त्यांनी डिरेक्ट मेसेज करून त्यांंचा नंबर आणि एररचा स्क्रिन शॉर्ट शेअर करण्याचं आवाहन केले आहे.