रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून (RBI) एचडीएफसी बॅंकेला (HDFC Bank) ला मोठा झटका देण्यात आला आहे. आरबीआयने एचडीएफसीला “Digital 2.0" अंतर्गत सारे डिजिटल बिझनेस जनरेशन योजना थांबवण्याचा सल्ला दिला आहे. सोबतच नव्याने कोणालाही क्रेडिट कार्ड जारी न करण्याच्या देखील सूचना देण्यात आल्या आहेत. मागील 2 वर्षांमध्ये एचडीएफसी बॅंकेच्या मोबाईल बॅंकिंग, नेट बॅकिंग, पेमेंट युटिलिटीज बद्दल येणार्या तक्रारी आणि तांत्रिक गोंधळ पाहता याबद्दल काल (2डिसेंबर) नोटीस देण्यात आली आहे. दरम्यान 21 नोव्हेंबर दिवशी देखील एचडीएफसीच्या प्रायमरी डाटा सेंटर मध्ये वीज गायब झाल्याने गोंधळ झाला होता.
Sashidhar Jagdishan यांची एचडीएफसी बॅंकेच्या chief executive पदी नियुक्ती होताच 2 महिन्यातच बॅंकेवर निर्बंध आले आहेत. दरम्यान त्यांच्याकडून digital banking बाबत काही महत्त्वाचे निर्णय अपेक्षित होते. एचडीएफसी बॅंकेकडून मात्र मागील 2 वर्षांपासून आयटी भागाला अधिक बळकट करण्यासाठी सतत्याने प्रयत्न केले जात आहेत. व्यवहार सुरळित ठेवण्यासाठी देखील प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात आले आहे.
आरबीआयने पाठवलेल्या नोटीसीमध्ये बॅंकेने त्रृटींचा विचार करून त्यांच्या अकाऊंटीबिलिटी म्हाणजेच उत्त्रदायित्त्वाबद्दल विचार करावा असे सूचवले आहे.
दरम्यान एचडीएफसी बॅंकेकडून देखील आरबीआयच्या नोटीसीवर माहिती देताना त्याचा सध्या ऑनलाईन बॅंकिंगची सेवा घेणार्या, क्रेडीट कार्ड धारकांना कोणताही फटका बसणार नसल्याचं म्हटलं आहे. बॅंकेकडून मागील तांत्रिक गडबडीबद्दल योग्य उपाय योजना करण्याचं काम सुरू आहे. तसेच ग्राहकांना सुरळीत व्यवहार करता यावेत यासाठी देखील सतत्याने प्रयत्न सुरू असल्याचा दिलासा देण्यात आला आहे.