देशभरात येत्या काही दिवसात आता सणांचे दिवस सुरु होणार आहेत. याच कारणास्तव आता ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करुन घेण्यासाठी मोठ्या कंपन्या शानदार सेलचे आयोजन करत आहे. याच दरम्यान आता सॅमसंग (Samsung) कंपनीने सुद्धा Home Festive Home ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना फ्रिज आणि काही होम अप्लायंसेसची खरेदी केल्यास त्यावर बंपर कॅशबॅक मिळणार आहे. ऐवढेच नाही तर ग्राहकांना स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर Galaxy S20 अल्ट्रा, Galaxy A31 आणि Galaxy Fold सारखे स्मार्टफोन फ्री मध्ये मिळणार आहेत. कंपनीची ही धमाकेदार ऑफर आजापासून सुरु झाली असून 20 नोव्हेंबर 2020 पर्यंत कायम असणार आहे.
ग्राहकांना फेस्टिव्ह सीजन अंतर्गत सॅमसंग क्यू एलईडी टीव्ही, QLED 8K TV's, UHD Tv's, Smart Tv सह Spacemax Family Hub फ्रिज खरेदीवर बंपर डिस्काउंट ते कॅशबॅक मिळणार आहे. या व्यतिरिक्त ग्राहकांना वॉशिंम मशीन आणि एसी वर सुद्धा आकर्षक डिल्स मिळणार आहेत.(Amazon Great Indian Festival Sale 2020: खुशखबर! iPhone 11 मिळणार आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीमध्ये; अॅमेझॉन देत आहे संधी)
सॅमसंगच्या शानदार ऑफरच्या वेळी ग्राहकांना कंपनीच्या 85 इंच, 82 इंच आणि 75 इंचासह QLED 8K टीव्हीच्या खरेदीवर गॅलेक्सी फोल्ड फ्री मिळणार आहे. त्याचसोबत ग्राहकांना 75 इंचाच्या QLED TV खरेदीवर Galaxy S20 Ultra आणि 55 इंचाचा QLED सह Galaxy A21s फ्री मध्ये दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त ग्राहकांना 65 इंचाच्या QLED, QLED 8K आणि 70 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेच्या क्रिस्टल 4K UHD TV खरेदी करण्यावर Galaxy A31 स्मार्टफोन फुकटात मिळणार आहे.
अन्य बेनिफिट्स बद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहकांना ऑफर अंतर्गत 20 हजार रुपयांचा कॅशबॅक दिला जाणार आहे. तसेच ग्राहक कंपनीच्या प्रोडक्टला 990 रुपयांच्या सुरुवाती EMI सह खरेदी करु शकतात. त्याचसोबत ग्राहकांना अधिकतर प्रोडक्ट्सवर 3 वर्षांपर्यंत वॉरंटी मिळणार आहे.(Samsung ने लॉन्च केला नवा एन्ट्री लेव्हल स्मार्टफोन, जाणून घ्या किंमतीसह फिचर्स)
जर ग्राहक सॅमसंगच्या फ्लॅगशिपमधील Spacemax Family Hub फ्रिज खरेदी करणार असल्यास त्यांना Galaxy Note10 Lite स्मार्टफोन दिला जाणार आहे. तसेच ग्राहकांना Samsung Curd Maestro फ्रिज खरेदीवर 15 टक्के ते 20 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. कंपनी ग्राहकांना Forest Free फ्रिजवर 10 टक्के कॅशबॅक आणि स्वस्त EMI वर खरेदी करण्याची संधी देणार आहे.