Apple iPhone 2019 (Photo Credits: Twitter)

गेल्या अनेक वर्षांमध्ये अ‍ॅमेझॉनने (Amazon) आपल्या विविध योजनांच्या अंतर्गत भारतामध्ये चांगलेच बस्तान बसविले आहे. आता अ‍ॅमेझॉनने घोषणा केली आहे की, त्यांचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल (Amazon Great Indian Festival Sale) 17 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. यावेळी, Apple च्या आयफोन 11 (iPhone 11) ची किंमत मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. अ‍ॅमेझॉन इंडियाच्या अॅपवर असलेल्या टीझर पोस्टरनुसार, या सणासुदीच्या सीझनदरम्यान, आयफोन 11 ची किंमत 50 हजार रुपयांच्या खाली घसरणार आहे. आयफोन 11 ची नक्की किती किंमत असेल याबाबत काहीच माहिती मिळू शकली नाही.

टीझर पोस्टरवर नमूद केले आहे की, आतापर्यंतचा सर्वात पॉवरफुल आयफोन सर्वात कमी किंमतीमध्ये आणि किंमत म्हणून 4_, 999 रुपये दर्शविली आहे. यावरून हे स्पष्ट होत आहे की, आयफोन 11 च्या 64 जीबी व्हेरीएंटवर मोठी सूट मिळणार आहे. सध्या आयफोन 11 ची अधिकृत किंमत भारतात 68,300 रुपये आहे. त्यामुळे अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन सेलमध्ये हा आयफोन 11 खरेदी करणार्‍या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. तसेच या सेलमध्ये, फोनवर अतिरिक्त डेबिट आणि कोणत्याही कार्डावर कॅशबॅक / इन्स्टंट ऑफर दिले जाण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: 17 ऑक्टोबरपासून सुरु होणार अ‍ॅमेझॉनचा बहुप्रतीक्षित 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल'; मिळणार अनेक सवलती व ऑफर्स)

Apple चे ट्रॅक रेकॉर्ड पाहता, वापरकर्त्यांना पुढील 3-4 वर्ष सॉफ्टवेअर अपडेट मिळत राहील. आयफोन 11 मध्ये 6.1 इंचाचा लिक्विड रेटिना एलसीडी पॅनेल आहे ज्यामध्ये बरेच आकर्षक रंग आहेत. हे Dolby Atmos सह Spatial Audio ला सपोर्ट करते. याला Apple च्या A13 Bionic चिपद्वारे पॉवर मिळते, जो कोणत्याही स्मार्टफोनवरील सर्वात वेगवान प्रोसेसर आहे. Apple ने आयफोन 11 ची रॅम आणि बॅटरी तपशील अधिकृतपणे जाहीर केले नाहीत परंतु अहवालानुसार त्यात 4 जीबी रॅम आणि 3,190 एमएएच बॅटरी सेल आहे. त्याच्या कॅमेरा युनिटमध्ये दोन 12 एमपी चे सेन्सर आहेत जे विस्तृत आणि अल्ट्रा वाइड शॉट्स घेण्यास सक्षम आहेत. सेल्फीसाठी यात फेस आयडीसह 12 एमपीचा ट्रूडेपथ फ्रंट कॅमेरा आहे.