Amazon Great Indian Festival Sale 2020: 17 ऑक्टोबरपासून सुरु होणार अ‍ॅमेझॉनचा बहुप्रतीक्षित 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल'; मिळणार अनेक सवलती व ऑफर्स
Amazon Great Indian Festival Sale 2020 (Photo Credit- File Photo)

सध्या बाजारात जाऊन खरेदी करण्यापेक्षा लोकांचा ऑनलाईन खरेदीकडे कल वाढला आहे. लॉक डाऊनमध्ये तर Amazon, Flipkart सारख्या कंपन्यांची लोकप्रियता अजूनच वाढली आहे. आता दिवाळी-दसरा यांसारख्या सणासुदीच्या दिवसांत ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी दोन्ही कंपन्यांनी खास सेलची घोषणा केली आहे. फ्लिपकार्टचा सेल 16 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे तर, आता Amazon ने घोषणा केली आहे की, त्यांचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल (Amazon Great Indian Festival Sale) 17 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. यामध्ये प्राईम मेंबर्सना 16 ऑक्टोबर 2020 पासून या सेलमध्ये खरेदी करता येणार आहे.

यावर्षी लाखो लघु व मध्यम व्यावसायिक ग्राहकांसमोर खास उत्पादने मांडणार आहेत. यामुळे एसएमबीला सध्याच्या कठीण काळात त्यांच्या व्यवसायाला पुन्हा उभारी देण्यासाठी मदत मिळणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना लोकल शॉप, अ‍ॅमेझॉन लॉन्चपॅड, अ‍ॅमेझॉन सहेली आणि अ‍ॅमेझॉन कारागीर सारख्या विविध कार्यक्रमांतर्गत, हजारो अ‍ॅमेझॉन विक्रेतांकडून उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सेल दरम्यान, ग्राहक केवळ 169 रुपयांमध्ये 3 महिन्यांची प्राइम मेम्बरशिप घेऊ शकतात. त्याच वेळी, या सेलमध्ये 50% ते 80% खरेदीवर सवलत मिळणार आहे. या दरम्यान आपण ‘नो कॉस्ट ईएमआय’ आणि ‘एक्सचेंज ऑफर’द्वारेही खरेदी करू शकणार आहात.

अ‍ॅमेझॉनने सांगितले आहे की, या सेलमध्ये देशभरातील सुमारे 1 लाख किराणा दुकाने, स्थानिक दुकाने आणि स्टोअर ग्राहकांना त्यांची सेवा देण्यास तयार आहेत. अ‍ॅमेझॉन प्रोग्रामवरील लोकल शॉप्सच्या माध्यमातून सुमारे 20 हजार ऑफलाइन किरकोळ विक्रेते प्रथमच ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये भाग घेतील. (हेही वाचा: फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डेज' सेल 16 ऑक्टोबर पासून सुरू; जाणून घ्या विविध वस्तूंवरील आकर्षक डिस्काउंट विषयी)

यावेळी मोठ्या ब्रँडची 900 हून अधिक नवीन उत्पादने बाजारात आणली जाणार आहेत. एचडीएफसी बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड आणि ईएमआय व्यवहारांवर 10% इन्स्टंट बँक सूट, डेबिट आणि क्रेडिट कार्ड्सवर नो कॉस्ट ईएमआय, बजाज फिनसर्व्ह आणि एक्सचेंज ऑफर सारख्या उत्कृष्ट ऑफर यावेळी मिळणार आहेत. अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये होम आणि किचन उत्पादनांवर 60 टक्के सवलत दिली जाईल. कपडे, इतर वस्तूंवर 70 टक्के सूट देण्यात येणार असून खाण्यापिण्याच्या गोष्टींवर 50 टक्के सूट देण्यात येणार आहे.