Samsung कंपनीने आपला एन्ट्री लेवल स्मार्टफोन Samsung Galaxy A03 Core लॉन्च केला आहे. फोनचे काही खास फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये वॉटरड्रॉप-स्टाइल नॉच दिले गेले आहेत. याच्या पाठीमागील बाजूस खालच्या बाजूला सॅमसंगचा लोगोसह सिंगल रियर कॅमेरा सेटअप ही दिला गेला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए03 कोर मध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. हा स्मार्टफोन दोन रंगाच्या ऑप्शनमध्ये येतो. फोनचा बॅक कॅमेऱ्याचा मॉड्युल एका वेगळ्या प्रकारे डिझाइन करण्यात आला आहे.
नव्या सॅमसंग गॅलेक्सी ए03 कोरला कंपनीच्या अधिकृत साइटवर लिस्टिंग करण्यात आले आहे. दरम्यान, याची किंमत आणि उपलब्धतेबद्दल अधिक माहिती दिली गेलेली नाही. परंतु हे स्पष्ट आहे की, हा सॅमसंगचा स्वस्त 4जी स्मार्टफोन असून त्याची टक्कर जिओफोन नेक्स्ट सोबत होणार आहे.(Redmi Note 11T 5G ची किंमत लीक, जाणून घ्या स्मार्टफोन बद्दल अधिक)
सॅमसंग गॅलेक्सी ए03 कोर मध्ये 6.5 इंचाचा HD+ इनफिनिटी-वी डिस्प्ले दिला गेला आहे. हा एक ऑक्टा-कोर SoC संचलित आहे, जो 2GB RAM सह येणार आहे. फोन कोणत्या प्रोसेसवर काम करतो त्याबद्दल सांगण्यात आलेले नाही. मायक्रोएसडीच्या सहाय्याने याचा स्टोरेज 32GB पर्यंत वाढवता येणार आहे.(OnePlus Nord 2 चा पुन्हा एकदा मोठा स्फोट; जळाली युजरची मांडी, कंपनी म्हणते... See Photos)
कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 8MP चा ऑटोफोकस लेन्ससह f/2.0 अपर्चरसह येणार आहे. यामध्ये 5MP चा फिक्स्ड फोकस लेन्स f/2.2 अपर्चरसह असणार आहे. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी सुद्धा दिली जाणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए03 कोरमध्ये डुअल-सिम-स्लॉट आणि हा 4G LTE कनेक्टिव्हिटीसह येणार आहे. ऑनबोर्ड सेंसरमध्ये एक्सेलेरोमीटर, लाइट सेंसर आणि प्रॉक्सिमीटर सेंसरचा समावेश आहे.