Redmi Note 11T 5G ची किंमत लीक, जाणून घ्या स्मार्टफोन बद्दल अधिक
Redmi (Photo Credit: Redmi India)

भारतात Redmi Note 11T 5G स्मार्टफोनची किंमत 16,999 रुपयांपासून सुरु होण्याची शक्यता आहे. याबद्दलची माहिती मनी कंट्रोल यांनी दिली आहे. चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी लवकरच रेडमी फोनचे तीन वेरियंट लॉन्च करणार आहे. त्यामध्ये बेस मॉडेल 6GB RAM+64GB स्टोरेज दिला जाणार आहे, रेडमी नोड 11टी 5जी च्या 6GB+128GB स्टोरेजची सुरुवाती किंमत 17,999 रुपये आणि 8GB+128GB स्टोरेजची किंमत 19,999 रुपये असण्याची शक्यता आहे. याची टक्कर शाओमी रिअलमीच्या 8s ला टक्कर देणार आहे. हा स्मार्टफोन यंदाच्या वर्षात सुरुवातीला 17,999 रुपयांना लॉन्च केला होता.

टिप्सटर योगेश बरार यांनी मनीकंट्रोलच्या सुत्रांद्वारे सांगण्यात आलेल्या बेस मॉडेलची लीक किंमतीची पुष्टी केली आहे. त्याचसोबत कंपनीने भारतात आपल्या रेडमी नोट 11टी 5जी लॉन्च इवेंटमध्ये इअरबड्स सुद्धा लॉन्च करणार आहे. परंतु इअरबर्ड्सबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही.(OnePlus Nord 2 चा पुन्हा एकदा मोठा स्फोट; जळाली युजरची मांडी, कंपनी म्हणते... See Photos)  

शाओमीने रेडमी नोट 11टी 5जी च्या लीक झालेल्या किंमतीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रिपोर्ट्सनुसार हा स्मार्टफोन भारतात 30 नोव्हेंबरला लॉन्च होण्याची शक्यता आहे.  असे ही बोलले जात आहे की, हा स्मार्टफोन पोको M4 Pro 5G प्रमाणेच असेल. जो रेडमी नोट 11 5जी चे रिब्रँन्ड वर्जन आहे. कंपनीने स्मार्टफोनच्या लॉन्चिंग किंवा किंमतीबद्दल कोणताही अधिकृत घोषणा केलेली नाही.

या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे. जी 33W फास्ट चार्जिंगसह येणार आहे.  कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास 11T 5G मध्ये डुअल सेंसर सेटअप मिळणार आहे. तसेच 50 मेगापिक्सलचा प्रायमेरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेंसर दिला जाऊ शकतो.