Samsung Galaxy M12 (Photo Credits-Twitter)

Samsung Galaxy M12 स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. फोन दोन स्टोरेज वेरियंटमध्ये उपलब्ध होणार आहे. तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 10,999 रुपये असून 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 13,499 रुपये ठेवण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम12 स्मार्टफोनचा पहिला सेल 18 मार्च 2021 ला दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे. ग्राहकांना फोन ई-कॉमर्स वेबसाइट Amazon, Samsung कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरुन खरेदी करता येणार आहे.

अॅमेझॉन प्राइम मेंबर्ससाठी 24 तास आधी या स्मार्टफोनचा सेल उपलब्ध करुन दिला जाणार आहे. हा एक मिड-रेंज स्मार्टफोन असून जो वाटड्रॉप नॉच डिस्प्ले आणि फ्रंट फेसिंग कॅमेरासह येणार आहे. फोन ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या मदतीने खरेदी करता येणार असून त्यावर 1 हजार रुपयांची सूट सुद्धा दिली जाणार आहे. फोन तीन कलर ऑप्शन ब्लॅक, ब्लू आणि व्हाइटमध्ये येणार आहे.(Xiaomi Mi 10S  स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत)

सॅमसंग गॅलेक्सी एम12 स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच इन्फिनटिव V डिस्प्ले दिला गेला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz असणार आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला असून याचा प्रायमरी कॅमेरा 48MP चा असणार आहे. या व्यतिरिक्त 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स सुद्धा दिला जाणार आहे. फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये कॅमेरा मोडसह अन्य कॅमेरा मोड्स सुद्धा दिले आहेत. फोनमध्ये 8mm चा Exynos 850 चिपसेट दिला जाणार आहे. फोन अॅन्ड्रॉइड 11 बेस्ड One Ui 3.1 सपोर्टसह येणार आहे. फोनमध्ये फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट स्कॅनरचे सपोर्ट मिळणार आहे. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 6,000mAh ची बॅटरी दिली जाणार असून 15W फास्ट चार्जरच्या मदतीने तो चार्ज करता येणार आहे.