Samsung Galaxy M02 (PC - Twitter)

Samsung कंपनीच्या Galaxy M02 स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ झाली आहे. नव्या किंमतीनुसार, या स्मार्टफोनच्या किंमतीत 500 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे या स्मार्टफोनची किंमत 7,499 रुपये इतकी झाली आहे. या स्मार्टफोनची आधी किंमत 6,999 रुपये इतकी होती. कमी किंमतीमुळे या स्मार्टफोनची विक्री प्रचंड प्रमाणात होत होती. त्यामुळे या स्मार्टफोनची लोकप्रियता लक्षात घेता या स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. या स्मार्टफोनचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे यात 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Samsung Galaxy M02 मध्ये 2GB रॅम+32GB स्टोरेज आणि 3GB रॅम+32GB स्टोरेज देण्यात आले आहे. या स्मार्टफोनच्या डिस्प्लेविषयी बोलायचे झाले तर, यात Galaxy M02 मध्ये 6.5 इंचाचा एचडी+Infinity-V डिस्प्ले देण्यात आला असून त्यात 5,000mAh ची बॅटरी 7.5W चार्गिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Galaxy M02s सारखाच असेल. केवळ रॅम आणि कॅमेऱ्यात फरक असेल. Galaxy M02 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट देण्यात आला आहे.हेदेखील वाचा- Samsung Galaxy M12 स्मार्टफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत

Samsung Galaxy M02 मध्ये 13MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर 2MP चा मॅक्रो सेंसरसुद्धा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 5MP चा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. या स्मार्टफोनचे अंतर्गत स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने 1TB वाढवता येऊ शकते. हा स्मार्टफोन Android 10 वर आधारित One UI वर काम करतो.

दरम्यान भारतात Samsung Galaxy M12 स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. फोन दोन स्टोरेज वेरियंटमध्ये उपलब्ध होणार आहे. तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 10,999 रुपये असून 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 13,499 रुपये ठेवण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम12 स्मार्टफोनचा पहिला सेल 18 मार्च 2021 ला दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे. ग्राहकांना फोन ई-कॉमर्स वेबसाइट Amazon, Samsung कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरुन खरेदी करता येणार आहे.