Smartphone apps (Photo Credits: Unsplash)

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कठोरतेचे युग सुरू आहे. जगभरातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे सुरक्षेबाबत संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. भारतात अलीकडेच भारत सरकार आणि ट्विटरमध्ये वाद झाले. भारतानंतर आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबूक, ट्विटर आणि टेलिग्रामला रशियात मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. रशियाच्या एका न्यायालयाने मंगळवारी म्हटले की, त्याने बेकायदेशीर सामग्री न काढल्याबद्दल अमेरिकन मीडिया कंपन्या फेसबुक आणि ट्विटर आणि मेसेजिंग अॅप टेलीग्रामला दंड ठोठावला आहे.

टागांस्की जिल्हा न्यायालयाने नोंदवले की फेसबुकला पाच प्रकरणांमध्ये एकूण 2.1 दशलक्ष रूबल (सुमारे 2.12 कोटी रुपये) दंड करण्यात आला आहे. तर ट्विटरला दोन प्रकरणांमध्ये एकूण 50 दशलक्ष रूबल (सुमारे 50.49 लाख रुपये) दंड भरावा लागेल. न्यायालयाने मेसेजिंग अॅप टेलीग्रामवर 90 लाख रुबल (सुमारे 90.88 लाख रुपये) दंडही ठोठावला आहे. फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामने अद्याप या प्रकरणी प्रतिक्रिया दिलेली नाही. रशियाने इंटरनेटवर नियंत्रण ठेवण्याच्या दिशेने कठोर पावले उचलून परदेशी इंटरनेट कंपन्यांना त्यांच्या देशात पूर्णवेळ कार्यालये उघडणे बंधनकारक केले आहे. कंपन्यांनी त्यांच्या प्रदेशातील रशियन नागरिकांशी संबंधित डेटा गोळा करणे आवश्यक आहे.(Google Maps, Gmail आणि YouTube येत्या 27 सप्टेंबर पासून 'या' स्मार्टफोनमध्ये होणार बंद)

14 सप्टेंबर रोजी दक्षिण कोरियाच्या अविश्वास नियामकाने गुगलवर मोठा दंड ठोठावला. अहवालानुसार, गुगलने मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम आणि अॅप मार्केटमध्ये बाजारातील वर्चस्वाचा गैरवापर केल्याबद्दल 207.4 अब्ज वॉन ($ 1768 दशलक्ष) महाकाय Google ला दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय चलनात ही रक्कम सुमारे 13.02 अब्ज रुपयांच्या बरोबरीची आहे. त्याचबरोबर गुगलने यावर आक्षेप घेतला आहे आणि या दंडाला आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे. गुगलने दक्षिण कोरियावर बदनामीचा आरोप केला.