Reliance Jio च्या रिचार्जवर युजर्सला मिळणार जबरदस्त कॅशबॅक, 'या' पद्धतीने लाभ घ्या
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

रिलायन्स जिओ (Reliance Jio) यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी विविध रुपयांचे रिचार्ज उपलब्ध करुन दिले आहेत. रिलायन्स जिओने असा दावा केला आहे की, त्यांचे रिचार्ज प्लॅन अन्य नेटवर्क कंपन्यांपेक्षा 15-20 टक्क्यांनी स्वस्त आहेत. जिओ कंपनी ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कॅशबॅकची संधी घेऊन आली आहे. रिलायन्स जिओ विविध रिचार्ज अॅपवर 50 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक देत आहे. यामध्ये पेटीएम, फोन पे, मोबिक्विक आणि फ्रीचार्ज सारखे अॅप यांचा समावेश आहे. तर गुगल पे वर 1500 रुपयापर्यंत रिवॉर्ड मिळणार असल्याची ऑफर दिली आहे. परंतु कॅशबॅक ऑफर काही काळापूर्तीच मर्यादित आहे.

PhonePe वर नव्या युजर्सला 75 रुपयांपर्यंत आणि याधापासूनच्या युजर्सला 50 रुपयापर्यंत रिवॉर्ड देण्यात येणार आहे. Paytym वर नव्या युजर्सला 30 रुपये (Code-PTMJIO30) आणि आताच्या युजर्ससाठी 15 रुपये (Code-PTMJIO15) कॅशबॅक दिला जात आहे. Amazon वर नव्या युजर्साठी 200 रुपये आणि जुन्या युजर्सला 50 रुपयापर्यंत रिवॉर्ड मिळणार आहे. Mobikwik वर सर्व युजर्सला 100 रुपये (Code-JIO50झ) सुपरकॅशचा लाभ घेता येणार आहे.(रिलायन्स जिओचे 251 रुपयांचे प्रसिद्ध 4 जी डेटा व्हाऊचर बंद; त्याऐवजी सुरू केला 'वर्क फ्रॉम होम पॅक')

Paytm वर 'या' पद्धतीने मिळवा कॅशबॅक

-सर्वात प्रथम पेटीएम सुरु करुन Prepaid/Postpaid ऑप्शन निवडा

-येथे रिचार्ज करण्यासाठी जिओ क्रमांक टाका

-लक्षात असू द्या Fast Forward येथे मार्क करु नका

-आता रिचार्ज किती रुपयांचे करायचे आहे त्याची किंमत टाका

-रिचार्ज पॅकची किंमत टाकल्यावर Proceed करा

-आता Apply Promocode ऑप्शन येथे जा

-जर तुम्ही नवे युजर्स असल्यास PTMJIO30 आणि जुन्या युजर्सने PTMJIO15 कोड टाका

-आता पेमेंटची प्रक्रिया पूर्ण केल्यास थोड्याच वेळात तुम्हाला पेटीएम वॉलेटमध्ये कॅशबॅक मिळणार आहे.

तर वरील स्टेप्स फॉलो करत जिओच्या कॅशबॅकचा लाभ घ्या. त्याचसोबत Freecharge अॅपवर नव्या युजर्सला 30 रुपये (Code-JIO30) आणि जुन्या युजर्सला 15 रुपये (JIO15) कॅशबॅक मिळणार आहे. सर्वाधिक कॅशबॅकची ऑफर गुगल पे वर देण्यात येत आहे. यावर तीन रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना 1500 रुपयांपर्यंत जिंकण्याची संधी मिळणार आहे.