
टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) यांच्या पोर्टफोलिओमध्ये एकापेक्षा एक अधिक उत्तम प्लॅन्स आहेत. कंपनी फ्री कॉलिंग आणि डेली डेटा सारखे काही धमाकेदार प्लॅन्स ही युजर्ससाठी ऑफर करत आहे. युजर्स सुद्धा अशा पद्धतीच्या प्लॅन्सच्या शोधात असून त्यांना अधिक डेटा आणि फ्री कॉलिंगसह अन्य बेनिफिट्स सुद्धा दिले जातात. याच कारणास्तव आम्ही तुम्हाला रियाइन्स जिओचे काही जबदरस्त प्लॅन्स बद्दल अधिक माहिती देणार आहोत. त्यामध्ये युजर्सला दरदिवसासाठी 3जीबी डेटा, फ्री कॉलिंग आणि एसएमएसचा सुद्धा फायदा घेता येणार आहे.(Reliance Jio चे मोठे यश; 40 कोटी ग्राहक संख्या पार करणारी भारतामधील पहिली टेलिकॉम कंपनी, 4G स्पीड मध्येही मारली बाजी)
Jio च्या 401 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला 28 दिवसांची वॅलिटिडी मिळणार आहे. प्रत्येक दिवशी 3 जीबी डेटासह पूर्ण वॅलिडिटी पिरेडसाठी 6 जीबी अधिक डेटा सुद्धा मिळणार आहे. त्यानुसार एकूण 90 जीबी डेटा मिळणार आहे. प्लॅनमध्ये जिओ नेटवर्क्ससाठी अनलिमिटेड फ्री कॉलिंग मिळणार आहे. तर दुसऱ्या नेटवर्क्सवर कॉल करण्यासाठी यामध्ये 1000 मिनिट्स दिले जाणार आहेत. प्लॅनच्या सब्सक्राइबर्सला एक वर्षासाठी डिज्नी+हॉटस्टारचे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे. हा प्लॅन फ्री सब्सक्रिप्शनसह येणार आहे.
कंपनीच्या 349 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये प्रत्येक दिवसासाठी 3 जीबी डेटा दिला जाणार आहे. 28 दिवसांची वॅलिडिटी असलेल्या या प्लॅनमध्ये जिओ-टू-जिओ अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा लाभ घेता येणार आहे. 401 रुपयांच्या प्लॅन प्रमाणेच यामध्ये ही दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी 1 हजार मिनिट्स दिले जाणार आहेत. प्लॅनमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे. तसेच प्रत्येक दिवसासाठी 100 फ्री एसएमएस सुद्धा पाठवता येणार आहेत.(Reliance Jio ने लाँच केला 1,499 रुपयांचा प्लान; ग्राहकांना मिळणार 300GB डेटा आणि अनलिमिटेड कॉल)
रिलायान्स जिओच्या 999 रुपयांचा प्लॅन 84 दिवसांची वॅलिटिडीसह रोज 3जीबी डेटा ऑफर केला जात आहे. प्लॅनच्या सब्सक्राइबर्सला जिओ क्रमांकावर फोन करण्यासाठी अनलिमिटेड फ्री कॉलिंगची सुविधा दिली जाणार आहे. दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी यामध्ये 3000 मिनिट्स मिळणार असून दररोज 100 फ्री एसएमएस पाठवता येणार आहेत. तसेच जिओ अॅप्सचे सुद्धा फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे.