Reliance Jio ने लाँच केला 1,499 रुपयांचा प्लान; ग्राहकांना मिळणार 300GB डेटा आणि अनलिमिटेड कॉल
Mukesh Ambani | Reliance Jio | Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: File Photo)

रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नव-नवीन ऑफर्ससह खास प्लान लाँच करत असते. जिओने जिओ पोस्टपेडप्लस (Jio PostpaidPlus) अंतर्गत आपला नवा पोस्टपेड प्लान लाँच केला आहे. जिओचे हे प्लान 399 रुपयांवरून 1,499 रुपयांपर्यंत आहे. या प्लानसोबत कंपनीने लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मवर विनामूल्य नेटफ्लिक्स, अॅमजॉन प्राइम आणि डिज्नी+हॉटस्टार चं सब्सक्रिप्शनसाठी ऑफर दिली आहे. रिलायन्स जिओच्या 1,499 रुपयांच्या जिओ पोस्टपेड प्लस योजनेत एकाच बिलाच्या कालावधीत 300 जीबीचा उच्च-स्पीड डेटा देण्यात आला आहे. 300 जीबी डेटा संपल्यानंतर, प्रति जीबी 10 रुपये शुल्क आकारले जाते. या योजनेत 500 जीबी डेटा रोलओव्हरची सुविधा देखील आहे. (हेही वाचा - LG 'Wing' Smartphone: प्रसिद्ध एलजी कंपनी मंगळवारी लाँच करणार रोटेटिंग स्क्रीन स्मार्टफोन 'विंग'; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स)

जिओच्या पोस्टपेड प्लस प्लॅनमध्ये व्हॉईस कॉलिंगसाठी अमर्यादित मिनिटांची ऑफर देण्यात आली आहे. याशिवाय तुम्ही अमर्याद एसएमएसलाही पाठवू शकता. यात Jio अॅप्सची सदस्यता देखील विनामूल्य देण्यात आली आहे. जिओच्या या योजनेत नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि डिस्ने + हॉटस्टार व्हीआयपीची सदस्यता मोफत मिळते. मात्र, जियोप्राइमसाठी ग्राहकांना स्वतंत्रपणे 99 रुपये शुल्क भरावे लागेल. जिओच्या या योजनेत अमेरिका आणि युएईमध्ये विनामूल्य अमर्यादित डेटा आणि व्हॉईस कॉलची सुविधादेखील देण्यात आली आहे.

दरम्यान, जिओने आपल्याय ग्राहकांना विमान प्रवासात कॉल करण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. यासाठी कंपनीने एरोमोबाईलबरोबर भागीदारी केली आहे. एरोमोबाईल पॅनासॉनिक एव्हिओनिक्स कॉर्पोरेशनची सहाय्यक कंपनी आहे. या करारामुळे जिओच्या सर्व ग्राहकांना विमान प्रवासादरम्यान जिओच्या सर्व सेवांचा लाभ घेता येणार आहे.