Reliance Jio (Photo Credit-Wikimedia Commons)

कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन हा 17 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. या काळात कर्मचा-यांना 'Work From Home' करण्याची सुविधा देण्यात आली आहे. अशा वेळी इंटरनेट स्पीडमुळे तुमच्या कामात व्यत्यय येऊ नये यासाठी जिओ (Reliance Jio) ने आपल्या ग्राहकांसाठी खास डेटा प्लान आणला आहे. ज्यात तुम्हाला 349 रुपयाचे रिचार्ज केल्यावर 3GB चा डेटा दरदिवसा मिळणार आहे. हा प्लान वर्क फ्रॉम होम करणा-यांसाठी खूपच फायदेशीर ठरेल.

Jio च्या या नव्या 349 रुपयांच्या प्लानमध्ये 28 दिवसांची वैधता मिळत आहे. यात दिवसाला 3GB असा एकूण 84GB चा डेटा मिळत आहे. दिवसा मिळणारा इंटरनेट डेटा संपला की तुमचा नेचचा स्पीड 64Kbps इतका होईल. यात जिओ-टू जिओ अनलिमिटेड कॉल्स मिळत असून जिओ टू अदर कॉल्समध्ये मध्ये 1000 मिनिट मोफत मिळत आहे. Zoom ला टक्कर देण्यासाठी रिलायन्स जिओ लवकरच लॉन्च करणार Jio Meet

याबरोबरच 100 SMS मिळत आहे. या पॅकमध्ये ग्राहकांना जिओ अॅप्सचे मोफत सब्सक्रिप्शन देखील मिळत आहे. तुम्ही रोज इंटरनेटचा अति प्रमाणात वापर करत असाल तर हा पॅक तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तसेच वर्क फ्रॉम होम करण्यासाठी या पॅकचा खूप उपयोग होईल.

रिलायन्स जिओ लवकरच त्यांचे व्हिडिओ कॉलिंग अॅप Jio Meet लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. हे अॅप Zoom, Google Meet, Hangout, Duo सारख्या व्हिडिओ सारख्या कॉलिंग अॅपला टक्कर देणारे ठरणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच फेसबुकने रिलायन्स जिओबरोबर भागीदारी केली आहे. जिओ मीट कॉलिंग अॅप लॉन्च करण्यामागे एक कारण असू शकते.