टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या युजर्संना चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी कंपनी सातत्याने नवे प्लॅन सादर करत असते. अलिकडेच जिओने नवा लॉन्ग टर्म प्लॅन सादर केला आहे. 4,999 रुपयांचा हा नवा प्लॅन असून यापूर्वी कंपनीने 2,121 रुपयांचा लॉन्ग टर्म प्लॅन सादर केला होता. या लॉन्ग टर्म प्रीपेड प्लॅन अंतर्गत कंपनी नेमक्या कोणत्या सुविधा देत आहे, पाहुया.
4,999 रुपयांच्या या प्लॅन अंतर्गत युजर्संना 360 दिवसांच्या व्हॅलिटीडीसह 350 जीबीचा डेटा दिला जात आहे. Fair Usage Policy (FUP)ची यात कोणतीही मर्यादा नसून युजर्स एका दिवसात हवा तितका डेटा वापरु शकतात. मात्र डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64kbps इतका असेल. 4,999रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात येत आहे. त्याचबरोबर जिओवरुन अन्य नेटवर्कवर कॉल केल्यास 12,000 मिनिटांचे फ्री कॉलिंग मिळेल. तसंच दररोज 100 SMS करण्याची मूभा देण्यात आली आहे. इतकंच नाही तर Jio Cinema, Jio TV यांसारख्या अॅपचे फ्री सब्सक्रिप्शन देखील दिले जात आहे. (Reliance Jio चे सर्वात बेस्ट प्रीपेड प्लॅन, दररोज युजर्सला मिळणार 2GB डेटा)
यापूर्वी लॉन्च करण्यात आलेल्या 2,121 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला 336 दिवसांसाठी 1.5 जीबी डेटा दररोज दिला जात होता. म्हणजे एकूण 504 जीबी डेटा देण्यात येत आहे. डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64kbps इतका असेल. यातही जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंगच्या सुविधेसह अन्य नेटवर्कसाठी 12,000 मिनिटांचे फ्री कॉलिंग मिळेल. 4,999 रुपयांचा प्लॅनप्रमाणे यातही 100 SMS सह Jio Cinema, Jio TV यांसारख्या अॅपचे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल.