रिलायन्स जिओ (Reliance Jio) ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध प्लॅन रोलआउट करते. काही ग्राहकांना वर्षभराचा प्लॅन तर काही जण महिन्याभराच्या पॅकचा रिचार्ज करणे पसंत करतात. दीर्घकाळ वॅलिडिटी असणाऱ्या प्लॅनचा असा अर्थ नाही होत की त्यात अधिक डेटाच ग्राहकाला दिला जाऊ शकतो. कमी कालावधीसाठीच्या प्लॅनमध्ये सुद्धा ग्राहकांना अधिक डेटा देणारे जिओचे काही प्लॅन उपलब्ध आहे. त्यापैकी एक जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन असून ग्राहकांना 28 दिवसांच्या वॅलिडिटी प्लॅनमध्ये जवळजवळ 84GB डेटा दिला जाणार आहे.
जिओचा 349 रुपयांचा प्लॅन 28 दिवसांचा असून त्यामध्ये ग्राहकाला प्रत्येक दिवसासाठी 3 जीबी डेटा दिला जाणार आहे. म्हणजेच महिन्याभरासाठी युजर्सला एकूण 84GB डेटा मिळणार आहे. जिओ टू जिओ कॉलिंग केल्यास ग्राहकाला अनिलिमिटेड कॉलिंगचा फायदा घेता येणार आहे. तसेच अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 1000 नॉन जिओ मिनिट्स देण्यात आले आहेत. जिओ अॅपच्या सब्सक्रिप्शनसाठी रोज 100 एसएमएस फ्री सुद्धा दिले जाणार आहेत.(रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म मध्ये अमेरिकन Vista Equity Partners ची गुंतवणूक; 11,367 कोटी रूपयांचा व्यवहार)