Redmi Note 8 आणि Note 8 Pro स्मार्टफोनसाठी पहिला सेल आजपासून सुरु, ग्राहकांना खरेदीवर मिळणार दमदार सूट
Redmi Note 8 Pro (Photo Credits-Twitter)

शाओमी (Xiaomi) कंपनीचे दोन धमाकेदार स्मार्टफोन Redmi Note 9 Pro आणि Redmi Note 8 साठी आजपासून पहिला सेल सुरु होणार आहे. तसेच स्मार्टफोनसाठी देण्यात आलेला क्वॉड कॅमेरा सेटअप हे यामधील मुख्य खासियत आहे. या सेलची सुरुवात दुपारी 12 वाजल्यापासून होणार आहे. ज्या ग्राहकांना हा स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास त्यांना तो अॅमेझॉनच ग्रेड इंडियन सेल किंवा mi.com वरुन खरेदी करता येणार आहे. तर रेडमीचे हे नवे स्मार्टफोन सेलमध्ये खरेदी केल्यास त्यावर दमदार ऑफर्स ग्राहकांना देण्यात येणार आहे.

कंपनी पहिल्याच सेलमध्ये दोन्ही स्मार्टफनवर बेस्ट डिल्स आणि ऑफर्स देणार आहे. अॅक्सिक बँक किंवा सीटी बँकच्या डेबिट/क्रेडिट कार्डवरुन खरेदी केल्यास ग्राहकांना 10 टक्के सूट देण्यात येणार आहे. स्मार्टफोनच्या किंमतीबाबत बोलायचे झाल्यास रेडमी नोट 8 ची सुरुवाती किंमत 9999 रुपये आणि रेडमी नोट 8 प्रो ची सुरुवाती किंमत 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे. रेडमी नोट 8 प्रो ती वेरियंटमध्ये म्हणजेच 6GB+64GB, 6GB+128gb आणि 8GB+128GB मध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. तर रेडमी नोट 8 स्मार्टफोनसाठी 4GB, 6GB RAM देण्यात आला आहे.

दोन्ही स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन बाबत बोलायचे झाल्यास, रेडमी प्रो मध्ये 6.53 इंचाचा फुल-एचडी+डॉट नॉच HDR डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचसोबत ऑक्टा-कोर मीडियाटेक हिलीयो G90T प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनला 65 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये सॅमसंग कंपनीच्या ISOCELL Bright GW1 सेंसरचा उपयोग केला आहे.(Amazon Great Indian Festival Sale: 21 ऑक्टोबर पासून पुन्हा सुरु होणार सेल, ग्राहकांना खरेदीवर मिळणार दमदार ऑफर्स)

तर रेडमी नोट 8 च्या स्पेसिफिकेशनमध्ये 6.3 इंचाचा फुल एचडी+डिस्प्ले दिला आहे. फोनला पावर देण्यासाठी 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच फोटोग्राफीसाठी 48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसरवर हा स्मार्टफोन काम करणार आहे.