Redmi Note 10 Pro चा आज दुपारी 12 वाजता सेल, जाणून घ्या किंमतीसह खासियत
Redmi Note 10 Pro (Photo Credits: Redmi India)

जर तुम्ही Redmi Note 10 Pro खरेदी करण्याचा विचार करत आहात तर तुमच्याकडे आज संधी आहे. कारण आज दुपारी 12 वाजता या स्मार्टफोनसाठी सेल असणार आहे. त्यामुळे Amazon India च्या माध्यमातून तुम्हाला रेडमी नोट10 प्रो स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. या व्यतिरिक्त कंपनीच्या अधिकृत वेबसाइट Mi.com वर सुद्धा उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन काही खास आणि शानदार फिचर लैस आहे. यामध्ये युजर्सला चार रियर कॅमेरा आणि दमदार बॅटरीची सुविधा मिळणार आहे.(Vivo Y30G: 5 हजार एमएएच बॅटरी, 3 कॅमऱ्यासह जबरदस्त फीचर्स असलेला विवो कंपनीचा धमकेदार स्मार्टफोन लॉन्च)

या स्मार्टफोन मधील 6GB+64GB मॉडेल 15,999 रुपयांत खरेदी करता येणार आहे. तर 6GB+12GB स्मार्टफोन 16,599 रुपयांना उपलब्ध होणार आहे. याच्या टॉप मॉडेलमध्ये 8GB+128GB स्टोरेज दिला गेला असून याची किंमत 18,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन Dark Night, Glacial Blue आणि Vintage Bronze रंगात उपलब्ध होणार आहे.

रेडमी नोट10 प्रो स्मार्टफोन जर तुम्ही ICICI बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यावर तुम्हाला 1 हजार रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त स्मार्टफोन नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन आणि एक्सचेंज ऑफरसह खरेदी करता येणार आहे.(OnePlus Nord ला टक्कर देण्यासाठी Moto G100 5G लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत) 

रेडमी कंपनीचा हा स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड 11 बेस्ड MIUI 12 वर आधारित असून Qualcomm Snapdragon 732G प्रोसेसरवर काम करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा सुपर एमोलेड FHD+डिस्प्ले दिला गेला आहे. यामध्ये युजर्सला फिंगरप्रिंट स्कॅनगर, डबल टॅप जेस्चर सारखे फिचर्सचा सपोर्ट मिळणार आहे. तर ग्राफिक्ससाठी Adreno 618 GUP दिला गेला आहे. तसेच क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 64MP चा असून 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 5MP ची सुपर मॅक्रो लेन्स आणि 2MP चा डेप्थ सेंसरचा सपोर्ट मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 20MP ची लेन्स दिली गेली आहे. तर पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5020mAh ची बॅटरी दिली गेली आहे.