Vivo Y30G: 5 हजार एमएएच बॅटरी, 3 कॅमऱ्यासह जबरदस्त फीचर्स असलेला विवो कंपनीचा धमकेदार स्मार्टफोन लॉन्च
Vivo Y30G (Photo Credit: Twitter)

Vivo Y30G has been launched in China: वीवो एक्स 60 सीरिज लॉन्च झाल्यानंतर विवो कंपनीने आता व्हाय सीरिजमधील आणखी एक धमाकेदार स्मार्टफोन बाजारात आणला आहे. कंपनीचा हा बजेट स्मार्टफोन असून विवो व्हाय30जी (Vivo Y30G) असे या स्मार्टफोनचे नाव आहे. विवो30जी स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. चीनमध्ये या फोनची किंमत 1,499 चीनी युआन म्हणजेच सुमारे 16,600 रुपये ठेवली गेली आहे. हा फोन कंपनीने एक्वा ब्लू, व्हाइट आणि ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये सादर केला आहे. हा फोन भारतात कधी लॉन्च होईल याबद्दल काही माहिती नाही.

विवो30जी स्मार्टफोनमध्ये 6.51 इंचाचा एचडी + आयपीएस डिस्प्ले आहे. मीडियाटेक हेलिओ पी 65 प्रोसेसरसह फोनमध्ये 8 जीबी रॅम देण्यात आली आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सेलचा आहे. तर, 2-मेगापिक्सलचा सेकंडरी लेन्स उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यापूर्वीही विवोने त्याचा व्हर्जन बाजारात आणला आहे. हा त्याचा अपडेट व्हर्जन आहे. हे देखील वाचा- Poco X3 Pro भारतात लाँच; जाणून घ्या 20 हजारापेक्षा कमी किंमतीच्या स्मार्टफोनची खासियत

वीवो व्हाय30जी मध्ये 128 जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. ज्यास मायक्रो-एसडी कार्डसह 1 टीबी पर्यंत वाढविले जाऊ शकतो. फोनमध्ये 5 हजार एमएएचची क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे, जी 18 डब्ल्यू फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 4 जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस / ए-जीपीएस, मायक्रो-यूएसबी आणि यूसबी. एमएम हेडफोन जॅक सारखी वैशिष्ट्ये आहेत. फोनच्या बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.