Poco X3 Pro भारतात लाँच; जाणून घ्या 20 हजारापेक्षा कमी किंमतीच्या स्मार्टफोनची खासियत
Poco X3 Pro (Photo Credits: Poco/Twitter)

पोको ने आज भारतात एक दमदार स्मार्टफोन लॉन्च केला. चीनी स्मार्टफोन ब्रँडने पोको एक्स3 प्रो (Poco X3 Pro) नावाने एक स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्च झालेल्या पोको एक्स3 चे हे अपग्रेडेड वेरिएंट आहे. हा स्मार्टफोनचा सेल 6 एप्रिल 2021 रोजी दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट (Flipkart)वर उपलब्ध होईल. या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी+(1080x2400 पिक्सल) डॉटडिस्प्ले आहे आणि प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 6 (Corning Gorilla Glass 6) देण्यात आला आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये  में ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नैपड्रैगन 860 प्रोसेसर देखील देण्यात आला आहे.

पोको या स्मार्टफोनमध्ये 5160 एमएएमच ची बॅटरी 33 व्हॅटच्या फास्ट चार्जिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे. यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून या स्मार्टफोनमध्ये अपर्चर एफ/1.79 सह 48 मेगापिक्सल, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाईड सेंसर, 2 मेगापिक्सल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये अपर्चर एफ/2.2 सोबत 20 मेगापिक्सल सेल्फी सेंसर देखील देण्यात आला आहे.

POCO Tweet:

पोको एक्स 3 प्रो मध्ये 6 जीबी आणि 8 जीबी रॅम सोबत 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आला आहे. मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून स्टोरेज 1 टीबीपर्यंत वाढवता येईल. हा स्मार्टफोन गोल्डन ब्रॉन्ज, ग्रेफाईट ब्लॅक आणि स्टील ब्लू या रंगात उपलब्ध असेल. पोको एक्स 3 प्रो च्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 17,999 रुपये आणि 8 जीबी +128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 19,999 रुपये इतकी आहे.