Redmi Note 10 5G (Photo Credits: Wikimedia Commons)

स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी (Xiaomi) लवकरच आपला Redmi Note 10 5G स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. नुकतीच BIS साइटवर या स्मार्टफोनची झलक पाहिली गेली. यावरून हा कमी बजेट मधील स्मार्टफोन असू शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हा स्मार्टफोन भारतात फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये लाँच होऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. BIS सर्टिफिकेशन साइटवर एक मॉडलला M2101K7A नावाने दिसेल. तथापि कंपनीकडून या स्मार्टफोनबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Redmi Note 10 च्या या सीरिजविषयी बोलायचे झाले तर, यात 4GB RAM + 64GB आणि 6GB RAM + 64GB स्टोरेज पर्याय असू शकतात. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्क सपोर्ट असण्याची शक्यता आहे.हेदेखील वाचा- Xiaomi भारतीय बाजारात आणणार Air Charger, हवेमध्ये चार्ज होणार तुमच्या मोबाईलसह अन्य इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स

या स्मार्टफोनच्या डिस्प्लेविषयी विशेष माहिती समोर आली नसून यात या स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप असू शकतो. याच्या स्टँडर्ड मॉडलमध्ये 48MP चा प्रायमरी कॅमेरा आणि प्रो मॉडलमध्ये 64MP चा प्रायमरी सेंसर कॅमेरा दिला जाऊ शकतो. याचा स्टँडर्ड मॉडल Qualcomm Snapdragon 732G सह येऊ शकतो. तसेच यात 5050mAh ची बॅटरी असू शकते.

दरम्यान शाओमी कंपनीने भारतीय बाजारात Air Charger आणणार असल्याचीही घोषणा केली आहे. या डिवाईसमुळे तुम्ही तुमचा मोबाईल कोणत्याही कॉडशिवाय हवेत चार्ज करु शकता. त्याचबरोबर केवळ मोबाईल नाही तर स्मार्टवॉच, स्मार्टबँड वा अन्य कोणताही इलेक्ट्रॉनिक स्मार्ट गॅजेट्स चार्ज करु शकता. या एअर चार्जरचे खास वैशिष्ट्य म्हणजे या डिवाईसने चार्जिंग करताना जर मध्ये एखादी भिंत वा काही अडथळा आला तर त्यातील उत्कृष्ट टेक्नोलॉजीमुळे कोणतीही बाधा येणार नाही.