Redmi 9 Prime (PC - Twitter)

Redmi 9 Prime Deal of the Day Offers in Amazon: शाओमीच्या Redmi 9 Prime स्मार्टफोनवर सध्या अॅमेझॉनवर डील ऑफ द ऑफर (Deal of the Day Offers) सुरू आहेत. ग्राहकांनी आज म्हणजेच 27 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजण्याच्या आधी रेडमी 9 प्राइम स्मार्टफोन खरेदी केला, तर त्यांना खास डिस्काऊंट देण्यात येत आहे. या वेळेस रेडमी 9 प्राइम स्मार्टफोनच्या खरेदीवर 3000 रुपयांची सुट देण्यात येत आहे. जर तुम्ही एखादा बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आपल्यासाठी ही ऑफर बेस्ट ऑप्शन ठरेल. रेडमी 9 प्राइम वर डील ऑफ द ऑफरमध्ये मिळणाऱ्या खास ऑफरविषयी जाणून घेऊयात.

Redmi 9 Prime किंमत आणि ऑफर -

रेडमी 9 प्राइम स्मार्टफोन 3000 रुपयांच्या सवलतीत 10,998 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध असेल. आयसीआयसीआय बँक डेबिट कार्डवरून खरेदी केल्यावर 1,500 रुपयांची त्वरित सवलत दिली जात आहे. तसेच फोन खरेदीवर 10,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देण्यात येत आहे. याशिवाय तुम्ही दरमहा 518 रुपयांच्या ईएमआय पर्यायानेदेखील फोन खरेदी करू शकता. (वाचा - Xiaomi Mi1 10i भारतात Amazon India वर सेलसाठी होणार उपलब्ध, 5 जानेवारीला होणार लॉन्च)

Redmi 9 Prime फिचर्स -

रेडमी 9 प्राइम स्मार्टफोन दोन स्टोरेज पर्याय 4 जीबी + 64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. रेडमी 9 प्राइममध्ये 6.53 इंचाचा फुल एचडी + आयपीएस डिस्प्ले आहे. हा फोन मीडियाटेक हेलिओ जी 80 प्रोसेसर सपोर्टसह देण्यात आला आहे. हा फोन एमआययूआय 11 वर अँड्रॉइड 10 ओएससह कार्य करतो. रेडमी 9 प्राइममध्ये फोटोग्राफीसाठी एकूण पाच कॅमेरे आहेत. यात क्वाड रियर कॅमेरा आणि सिंगल फ्रंट कॅमेरा आहे.

या फोनमध्ये 13 एमपी प्राइमरी सेन्सर, 8 एमपी अल्ट्रा वाईड एंगल लेन्स, 5 एमपी मॅक्रो शूटर आणि 2 एमपी खोलीचा सेन्सर मिळेल. तसेच यातील 8 एमपीचा फ्रंट कॅमेरा व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी वापरला जाऊ शकतो. यात 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,020mAh बॅटरी आहे.