Realme X7 Max 5G Smartphone (Photo Credits: Realme)

रियलमी इंडिया (Realme India) आज भारतात रियलमी एक्स7 मॅक्स 5जी (Realme X7 Max 5G) स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. यापूर्वीच हा स्मार्टफोन लॉन्च होणार होता. मात्र कोरोना संकटामुळे लॉन्चिंग पुढे ढकलण्यात आलं होतं. आज दुपारी 12.30 वाजता मोबाईल लॉन्च होणार असून याचे ऑनलाईन प्रक्षेपण तुम्ही कंपनीच्या अधिकृत युट्युब चॅनलवर पाहु शकता. दरम्यान, लॉन्चिंगपूर्वी जाणून घेऊया या स्मार्टफोनची खासियत आणि किंमत याबद्दल...

Realme X7 Max 5G स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 1200 SoC प्रोसेसर दिला आहे. तसंच 6.43 इंचाचा फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले punch-hole cutout आणि 120Hz चा रिफ्रेश रेट दिला आहे. 12जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून तुम्ही स्टोरेज वाढवू शकता. (OnePlus Nord 2, Galaxy A22 5G सह 'हे' शानदार स्मार्टफोन जून मध्ये होणार लॉन्च)

Realme X7 Max 5G Smartphone (Photo Credits: Realme)

फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला असून 64MP चा प्रायमरी सेन्सर 8MP वाईल्ड एंगल लेन्स आणि 2MP चा कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन अॅनरॉईड 11 वर आधारित Realme UI 2.0 वर बनवला आहे. यामध्ये 4,500mAh ची बॅटरी 50W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची किंमत 25,000 ते 30,000 च्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.